Marathi Biodata Maker

ग्रंथालयांच्या मागण्यांबाबत अर्थसंकल्पात तरतूद करणार

शुक्रवार, 9 मार्च 2018 (07:05 IST)
महाराष्ट्रातील ग्रंथालये व ग्रंथालय कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांबाबत 2018-19 च्या राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समिती पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती संपर्क कार्यालयाने दिलेल्या  प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.
 
राज्यातील ग्रंथालय कर्मचार्यांना वेतनश्रेणी व सेवा नियमित शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे लागू करण्यात यावी, तोपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावे, नवीन मान्यता व वर्गवाढ प्रस्ताव शासनाने स्वीकारून पुढील कार्यवाही करावी. कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाइन  मिळण्याची कार्यवाही व्हावी आदी मागण्यांचे निवेदन अर्थमंत्र्यांना देण्यात आले.
 
या शिष्टमंडळात कुंडलिक मोरे, रवींद्र कामत, सुनील कुबल, अक्रूर सोनटक्के, रमेश सुतार, बाबासाहेब कोल्हे, रिजवान शेख आदींचा समावेश होता. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: लोकसभेने ६ खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मंजुरी दिली

ठाकरे गटाला मोठा धक्का; लोकसभा सचिवालयाने सहा बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मंजुरी दिली

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाने जामीन रद्द केला

महाराष्ट्रात वार्षिक कृषी हॅकेथॉनचे आयोजन होणार, विजेत्यांना अजित पवार यांच्या नावाने २५ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे

भाषण नाही, मुलाखती नाहीत… सुप्रिया सुळे पुढील तीन दिवस शांत राहणार; कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments