गुरूवार, 23 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Updated: सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (08:15 IST)

UPSC ExamTips: UPSC ची तयारी करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

exam
संघ लोकसेवा आयोग, UPSC गट 'A' आणि 'B' अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी परीक्षा घेते. यूपीएससी ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी त्यासाठी तयारी करतात.पण, फारच कमी लोक त्यात यश मिळवतात.कारण यूपीएससीचा पेपर सोडवणे इतके सोपे नाही. त्यासाठी वाचन आणि लिखाणाचा सराव करावा लागतो. UPSC परीक्षेत यश मिळण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.चला तर मग जाणून घेऊ या.
 
यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठीटिप्स- 
1. UPSC च्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करा- UPSC ची तयारी करण्यापूर्वी,  स्वतःला तयार करा. स्वतःचे मूल्यांकन करा. परीक्षेची तयारी करण्यापूर्वी मानसिक आणि शारीरिकरित्या तयारी करा.
 
2. वेळापत्रक बनवून अभ्यास करा- UPSC परीक्षेत यश संपादन  करण्यासाठी, प्रत्येक दिवसासाठी पद्धतशीर अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. असं केल्याने विद्यार्थ्याला सर्व विषयांचा अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळेल.
 
3. दररोज वृत्तपत्र वाचा- UPSC तयारीसाठी वृत्तपत्र सर्वात महत्वाची भूमिका बजावते. जगभरातील वर्तमान बातम्यांसह अपडेट राहा आणि वर्तमानपत्रातील. संपादकीय लेख आवर्जून वाचा.
 
4. पर्यायी विषयाची निवड- अधिक परिचित असलेला पर्यायी विषय निवडा.आवडणारा विषय निवडा.
 
5. उत्तर लिहिण्याचा सराव करा- UPSC परीक्षेत उत्तर लिहिण्याचा सराव महत्त्वाची भूमिका बजावतो. लेखनाच्या सरावामुळे आव्हानात्मक परीक्षांची तयारी करताना परीक्षेत लिहिणे सोपे जाते. लेखनाचा दर्जा सुधारतो.
 
6.  NCERT पुस्तकेअधिक वाचा- UPSC परीक्षेची तयारी करताना, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ची अधिक पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करा. हे खूप उपयुक्त आहेत.
 
7. नियमित मॉक टेस्ट द्या- स्वतःचे विश्लेषण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित मॉक टेस्ट देणे. यावरून  परीक्षेसाठी किती तयारी झाली आहे हे कळेल.
 
Edited By - Priya Dixit