Marathi Biodata Maker
✕

Mango Chutney Recipes: आंब्याची चटणी अशा प्रकारे तयार करा, रेसिपी जाणून घ्या

Updated: शनिवार, 22 जुलै 2023 (11:32 IST)
 
ही रेसिपी बनवायला खूप सोपी तर आहेच पण खायला पण खूप चविष्ट आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी आंब्याची चटणी अगदी अनोख्या पद्धतीने तयार केली जाते. चला जाणून घेऊया ते बनवण्याची पद्धत जाणून घेऊ या.
 
साहित्य -
2 आंबे - (चिरलेले )
3 -हिरव्या मिरच्या 
अर्धा टीस्पून - हळद
अर्धा कप -तेल 
अर्धा टीस्पून -जिरे  
अर्धा टीस्पून- मोहरी 
2 टेस्पून -शेंगदाणे 
4 कढीपत्ते  
2 -लाल सुकी मिरची 
अर्धा टीस्पून -मेथी दाणे
अर्धा टीस्पून- आमसूल पूड
 
कृती- 
ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम 2 आंबे सोलून घ्या. यानंतर त्याचे तुकडे करून एका भांड्यात ठेवा. आता बाऊलमध्ये 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद टाकून नीट मिक्स करा. आता सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाका आणि बारीक वाटून घ्या. आता ते एका भांड्यात काढून गॅसवर गरम करण्यासाठी पॅन ठेवा. 
 
आता एका कढईत अर्धी वाटी तेल गरम करून त्यात अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा शेंगदाणे, अर्धा चमचा जिरे, 4 कढीपत्ता, 2 लाल सुकलेल्या मिरच्या, अर्धा चमचा आमसूल पूड, अर्धा चमचा मोहरी टाकून फोडणी द्या. फोडणी तयार झाल्यावर त्यात आंब्याचा पल्प घालून ढवळा. मिक्स केल्यानंतर 2 मिनिटे ढवळत असताना शिजवा. या सोप्या पद्धतीने तुमची चटणी तयार होईल. तुम्ही ते फ्रीजमध्ये जारमध्ये देखील ठेवू शकता. रोटी आणि भातासोबत सर्व्ह करा.
 





Edited by - Priya Dixit      
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आरोग्यासाठी सुपरफूड नाचणीच्या ५ चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीस

दररोज उन्हात बसूनही व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होत नाही? सूर्यप्रकाश घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ४,६५१ शिकाऊ पदांची भरती सुरू, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

हिवाळ्यात टाचांना पडताहेत भेगा? झोपण्यापूर्वी करा हे सोपे घरगुती उपाय

जेवल्यानंतर १० मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला होतील हे आरोग्यदायी फायदे

पुढील लेख
Show comments