1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Updated : सोमवार, 19 जून 2023 (22:31 IST)

Mango Pickle आंब्याचे लोणचे केरळी पद्धतीने

Mango Pickle Recipe
सामग्री 
कच्च्या कैरीचे तुकडे - 2 कप
लाल तिखट - 3 चमचे
हिंग – 1 चमचा
हळद - ¼ चमचा
मोहरी - 1 चमचा
तेल – 3 चमचे
मीठ - चवीपुरते
 
कृती
तापलेल्या तेलात मोहरी घाला आणि ती तडतडू लागल्यावर, आच मंद करा. लाल तिखट, मीठ, हिंग आणि हळद घाला आणि 3 मिनिटे ढवळा. आता आच बंद करा आणि थोडावेळ थंड होऊ द्या. कापलेल्या कैरीवर हे मिश्रण घाला आणि चांगले मिसळा. कैरी मुरण्यासाठी हे 7-8 दिवस ठेवा. तुम्ही याचा ताजेपणा टिकविण्यासाठी डिस्टिल्ड व्हिनेगरसुद्धा घालू शकता. 
 
श्रीमती. लीला वेणू कुमार 
 
साभार : keralatourism