Daily Horoscope
✕

सांगलीत अडकलेले तामिळनाडूचे ४८० जणांना घेऊन एसटीच्या १६ बस रवाना

Updated: शनिवार, 9 मे 2020 (06:36 IST)
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी याच्या प्रयत्नामुळे सदर व्यक्तींना सेलम, तामिळनाडू येथे त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देत त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्वाना खाण्यासाठी टिकाऊ अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या देऊन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

सांगलीमध्ये लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथील सुमारे 480 जण अडकले होती. ते एमआयडीसी सांगली/ कुपवाड मध्ये विविध ठिकाणी कामधंदा करत होती. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आपआपल्या गावी जाण्यासाठी ते एकत्र जमले परंतु त्यांना परत त्यांच्या सांगली येथील निवासाच्या ठिकाणी सांगली जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिका यांनी परत पाठविले. आज पर्यत प्रशासनाने त्यांचे जेवण खाण्याची सोय केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न केल्यामुळे सदर व्यक्तींना सेलम तामिळनाडू येथे त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली.

सर्वांची वैद्यकीय तपासणी करून ते कोविड सदृश आजार नसल्याची तपासणी करून महसूल यंत्रणेने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत एसटीच्या 16 बसने तामिळनाडू राज्यातील सेलम येथील 480 जणांना रवाना केले.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

महायुतीतील कलह चव्हाट्यावर! CM फडणवीसांचा शिंदे गटाला मोठा धक्का; मंत्र्याचे अधिकार काढून घेतले

सारा तेंडुलकर लवकरच अडकणार लग्नबंधनात? सचिन अन् वहिनी सानियाने दिले मोठे संकेत; पाहा VIDEO

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ महत्त्वाचे निर्णय: विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, अभय योजना आणि शेतकऱ्यांना मदत

Old Monk उत्पादकाने उच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली; लेबल्समध्ये बदल केले जाणार

१० रुपयांवरून वाद; चालत्या बसमधून ढकललेल्या महिला कंडक्टरचा १० दिवसांनंतर मृत्यू!

पुढील लेख
Show comments