suvichar

राज्यात ४ हजार १४५ नवीन करोनाबाधित आढळले

मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (08:51 IST)
राज्यात डेल्टा  प्लस या नवीन आजाराचे रूग्ण देखील आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. दररोज राज्यात आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्यी ही करोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. सोमवारी  राज्यात ५ हजार ८११ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार १४५ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय , राज्यात १०० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ६१,९५,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८६ टक्के एवढे झाले आहे.  आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,९६,८०५ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत एकूण १३५१३९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६२,४५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: धर्मांतर आणि महिलांच्या छळाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन होणार

वर्षभर चांगला भाव मिळतो; शिमला मिरची लागवड प्रचंड नफा मिळवून देणारा व्यवसाय

प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कठोर कारवाईची घोषणा केली

महाराष्ट्रात धर्मांतर आणि महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली जाणार

कॅफेमध्ये कट रचला गेला; सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा; केतनची हत्या एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखी

पुढील लेख
Show comments