शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑगस्ट 2021 (11:25 IST)

कॅरिबियन देश हैती 7.2 तीव्रतेच्या भूकंपामुळे हादरला, आतापर्यंत 304 लोकांचा मृत्यू झाला, शेकडो जखमी

हैती या कॅरिबियन देशात शनिवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मृतांचा आकडा 300 च्या वर गेला आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.2 मोजण्यात आली. भूकंपामुळे किमान 1800 लोक जखमी झाल्याची माहिती आहे.अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार,भूकंपाचा केंद्रबिंदू येथून 12 किलोमीटर उत्तर-पूर्वी मध्ये  सेंट लुईस दु सुद येथे होता.
 
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी हैतीला अमेरिकेच्या मदतीला तत्काळ प्रभावाने मंजुरी दिली आहे. 
 
जागतिक आरोग्य संघटनेने असेही म्हटले आहे की ते या परिस्थितीत हैतीच्या लोकांच्या पाठीशी उभे आहे आणि लोकांना त्यांच्या आरोग्य संबंधांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करत आहे.
 
हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांनी म्हटले आहे की भूकंपामुळे देशाच्या दक्षिण भागात मोठे नुकसान झाले आहे. ते म्हणाले की, पीडितांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. 
 
या भूकंपामुळे पंतप्रधान एरियल हेनरी यांना पुढील एक महिन्यासाठी देशात आणीबाणी घोषित करण्यास भाग पाडले आहे.