1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 20 जुलै 2020 (07:55 IST)

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के

राज्यात रविवारी ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६९ हजार ५६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ नमुन्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८२ टक्के एवढा आहे.