Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना : 'रामदेव बाबांनी बिनशर्त माफी मागावी', अॅलोपॅथीला 'फालतू विज्ञान' म्हटल्यानं IMA आक्रमक

Updated: रविवार, 23 मे 2021 (16:03 IST)
'पतंजली'कडून स्पष्टीकरण
रामदेव बाबांच्या वक्तव्यानं वाद वाढल्यानं पतंजली योगपीठाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
 
पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालाकृष्ण यांनी ट्विटरवर पतंजलीची बाजू मांडणारं पत्र ट्वीट केलं आहे.
त्यात म्हटलंय की, "रामदेव बाबांनी हे मत खासगी कार्यक्रमात मांडलं होतं आणि त्यावेळी ते व्हॉट्सअॅपवर आलेले काही मेसेज वाचत होते. रामदेव बाबांनी आधुनिक विज्ञानाबाबत कधीच अविश्वास व्यक्त केला नाही."
 
रामदेव बाबांविरोधात IMA आक्रमक
रामदेव बाबांविरोधात आता इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए ने नाराजी व्यक्त करत, एक पत्र केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलंय.
 
IMA ने या पत्रात म्हटलंय की, "योग गुरुजी आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण हे स्वतः आजारी पडले की अॅलोपॅथीची औषधं घेतात, हे सर्वांना ठाऊक आहे. आता ते लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशी वक्तव्यं करत आहेत, जेणेकरून त्यांच्या मान्यता प्राप्त नसलेल्या औषधींचा खप वाढेल."
IMAने या पत्रात दोन प्रश्न उपस्थित केलेत.
 
एक म्हणजे, "आजवरच्या आधुनिक अॅलोपॅथिक औषधींवर त्यांनी शंका उपस्थित करून भारताच्या DCGI, AIIMS आणि आरोग्य मंत्रालयाच्या कामकाजावर, प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशात जर लोकांच्या मनात या उपचारांविषयी शंका आणि भीती निर्माण झाली, तर हे कृत्य देशविरोधी नाही का?"
 
दुसरा प्रश्न म्हणजे, "आजवर सुप्रीम कोर्टाने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरच्या उपलब्धतेबाबत वेळोवेळी काही निर्णय दिले आहेत. मग लाखो अनुयायी असलेल्या एक मोठी व्यक्तीने अशी वक्तव्यं करणं कोर्टाचा अवमान ठरत नाही का?"
 
IMA ने या पत्रात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना उद्देशून म्हटलंय की, ते सुद्धा एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये.
 
"एक तर तुम्ही या वक्तव्याचा निषेध करावा किंवा त्यांना समर्थन द्यावं. जर आरोग्यमंत्र्यांनी यावर काहीच केलं नाही, तर आम्ही कोर्टाची दारं ठोठावायला बांधील आहोत," असंही IMA ने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलंय.
दुसरीकडे, ट्विटरवरील एका युजरच्या कमेंटला उत्तर देताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या द्वारका विभागनं म्हटलंय की, ते आम्ही अवमान याचिका आणि FIR सुद्धा दाखल करत आहोत.
 
आता रामदेव बाबा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची या सर्व प्रकरणावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाते ठरेल.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला

नियमांनुसार काम करता येत नसेल तर राजीनामा द्या…तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

ट्रेनमध्ये धूम्रपान करणे आता खूप महागात पडणार! रेल्वेने दंड २० पटीने वाढवून ₹१०० वरून ₹२,००० केला

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

पुढील लेख
Show comments