शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (22:48 IST)

राज्यात आज कोरोनाची 26,133 नवीन प्रकरणे, नोंदली,तर 40 ,294 जणांना डिस्चार्ज मिळाला.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता आज नवीन 26,133 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 40,294 लोकांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. 
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 55,53,225 एवढी झाली आहे. त्यापैकी 51,11,095 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.सध्या राज्यात 3,52 ,247 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.     
राज्यात आता पर्यंत 3,27,23,361 चाचण्या घेतल्या आहेत.राज्यात सध्या एकूण 27,55 ,729 घरातच उपचार घेत आहे म्हणजे होम क्वारंटाईन आहेत. तर 22,103 लोकांना कोविड केंद्रावर क्वारंटाईन केले आहे.
आज राज्यात एकूण 682 रुग्ण या आजाराला बळी गेले असून दगावले आहेत. राज्यात आता पर्यंत 87,300 लोक मृत्युमुखी झाले आहेत. राज्यात कोरोनाची मृत्यू दर 1.57 टक्के आहे.तर रिकव्हरी दर वाढला असून सध्या 92.04 वर पोहोचला आहे.