बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (08:14 IST)

दिलासादायक ! 40 हजारांहून कमी रुग्ण; 61,607 जणांना डिस्चार्ज

राज्यात संसर्गाचा वेग मंदावत असून बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सोमवारी  37 हजार 236 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 61 हजार 607 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णापेक्षा अधिक आहे.
 
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 51 लाख 38 हजार 973 झाली असून, त्यापैकी 44 लाख 69 हजार 425 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 86.97 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
सध्या राज्यात 5 लाख 90 हजार 818 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी 549 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एकूण 76 हजार 398 जण मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.48 टक्के एवढा आहे.
 
सध्या राज्यात 36 लाख 70 हजार 320 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 26 हजार 664 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 96 लाख 31 हजार 127 नमूने तपासण्यात आले आहेत.