रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (22:46 IST)

दिलासादायक बातमी :राज्यात कोरोनाच्या प्रकरणात मोठी घसरण मुंबईवरून देखील चांगली बातमी आली

सोमवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे दररोजचे प्रमाण कमी होत आहे. राज्यात केवळ 37 हजार नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. राज्यात कित्येक दिवसांपासून 60 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे प्राप्त झाली, त्यानंतर ही संख्या कमी होऊ लागली. आज जाहीर केलेली संख्या 30 मार्चनंतरची सर्वात कमी आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या नवीन प्रकरणांबाबत राज्य राजधानी मुंबईहून एक चांगली बातमीही समोर आली आहे. मुंबईत दोन हजारांहून कमी नवीन कोरोना प्रकरणे आढळली आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे  37,236 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून त्यानंतर संक्रमित लोकांची संख्या वाढून 51,38 ,973 झाली आहे. राज्यात सध्या 5 ,90,818 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे.549 लोक मृत्युमुखी झाल्यावर एकूण मृतांचा आकडा  76,398 वर पोचला आहे.आतापर्यंत, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून 44,69,425 झाली आहे. गेल्या एका दिवसात, कोरोनाहून 61,607 लोक बरे झाले आहेत. 
 
आज मुंबईत केवळ 1,794 नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत. तसेच 74 लोकांचे प्राण गमावले आहेत. शहरातील संक्रमित लोकांची संख्या वाढून 6,78,269 झाली आहे. आता तर कोरोनाचे केवळ 45,534 सक्रिय प्रकरणे आहेत.

यापूर्वी रविवारी महाराष्ट्रात कोविड -19 च्या,48,401नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची संख्या वाढून 51,01,731, झाली.त्याच वेळी, आणखी 572 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. 5 एप्रिलनंतर पहिल्यांदाच हे घडले जेव्हा एकाच दिवसात 50,000 पेक्षा कमी नवीन प्रकरणे नोंदली गेली. 5 एप्रिल रोजी राज्यात 47,288 नवीन प्रकरणे नोंदली गेली.