सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (16:55 IST)

कोरोना व्हायरस शरीरातील कोणकोणत्या अवयवांना नुकसान पोहोचवतो याबाबत धक्कादायक माहिती समोर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरस शरीरातील कोणकोणत्या अवयवांना नुकसान पोहोचवतो याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिसर्चमधून भीतीदायक  खुलासा करण्यात आला आहे.
 
द लँसेट मायक्रोबमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये कोरोना व्हायरासमुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यांच्या फुफ्फुस आणि किडनीला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली असल्याची माहिती
इंग्लंडमधील कोरोना रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला आहे. 
पीरिअल कॉलेज लंडन आणि इंपीरिअल कॉलेज हेल्थकर एनएनचएस ट्रस्टने हा रिसर्च केला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दहा पैकी नऊ रुग्णांना हृदय, किडनी आणि फुफ्फुसामध्ये थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताच्या गुठळ्या सापडल्या
 रिसर्चमधील डॉ. मायकल ऑस्बर्न यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस फुफ्फुसांना पूर्णपणे नष्ट करतो ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होता.
इंपीरिअल कॉलेज एनएचएस ट्रस्टच्या रुग्णालयात  22 ते 97 वयोगटातील कोरोना रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला. 
कोरोना रुग्णांच्या किडनीचं कोरोनामुळे नुकसान होतं आणि आतड्यांना सूज आल्याची माहिती रिसर्चमधून समोर आला 
जगभरात रुग्णांची एकूण संख्या 24,058,354 आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
823,510 जणांचा मृत्यू झाला आहे. 
16,608,018 जणांनी कोरोनावर मात केली आहे.