Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१० ऑगस्टपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या २० लाखांवर जाईल : राहुल गांधी

Updated: शुक्रवार, 17 जुलै 2020 (15:08 IST)
“सध्या देशातील करोनाबाधितांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे. या वेगानं करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर देशात १० ऑगस्टपर्यंत २० लाखांपेक्षा अधिक करोनाबाधित होती. सरकारला ही महामारी रोखण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे,” असं मत राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केलंय त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

ओलांडला १० लाखांचा टप्पा

देशातील करोना रुग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्याच्या घडीला देशातल्या करोना रुग्णांची संख्या १० लाख ४ हजार ५९० इतकी झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात ३ लाख ४२ हजार रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत देशभरात करोनाची लागण होऊन २५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रात मागील गुरूवारी ८ हजार ६४१ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार २८१ इतकी झाली. तर २४ तासांमध्ये २६६ मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान, २४ तासांमध्ये ५ हजार ५२७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा उपोषण सुरू केले

हॅपी रक्षाबंधन ताई' आई बाबांना सांभाळ स्टेटस पोस्ट करत ११वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

हॉकीच्या रोमांचक पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमकडून पराभूत झाल्यामुळे भारत आठव्या स्थानावर

नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर, भारतीय ॲथलेटिक्स पथकाला मोठा धक्का

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा उपोषण सुरू केले, हे त्यांचे शेवटचे आंदोलन असेल म्हणाले

पुढील लेख
Show comments