गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मार्च 2020 (17:49 IST)

Life in the times of corona : work @ home आहात तर हे 5 काम करा, खूप कामास येतील

कोरोना, कोरोना आणि केवळ कोरोना... सध्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कोपर्‍यात, प्रत्येक देशातून एकच आवाज येत आहे. आवाज ज्यात भीती आहे, काळजी आहे, चेतावणी आहे, शंका आहे, सावधगिरी आहे परंतू आम्ही अश्या नकारात्मक वातावरण काही सकारात्मक विचारांसह पुढे वाढू शकतो. सध्या अनेक ऑफिस, कंपनी, शाळा आणि संस्थांमध्ये work @ home आदेश लागू आहे. अशात विचार करा की अचानक मिळालेल्या या वेळात आरोग्य, सुरक्षा आणि सावधगिरीसह या वेळेचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो. कारण ऑफिसमध्ये जाण्या-येण्याचा वेळ वाचत असल्यामुळे आपण या दरम्यान असे काही करू शकता- 
 
1. घराची सफाई- सजावट
अनेक व्यस्त लोक आपल्या घराच्या सफाईकडे हवं तेवढं लक्ष देऊ पात नाही. अनेकदा यासाठी नोकरांवर अवलंबून राहावं लागतं किंवा किती तरी काळ हे कामं पेंडिंग राहतं. अशात ही वेळ घरात सफाई आणि अनुपयोगी वस्तू घरातून बाहेर काढण्याची आहे. घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ असेल तेव्हा आपलं देखील निरोगी राहाल. या दरम्यान ज्या वस्तू मागील सहा महिन्यांपासून कामास आल्या नसतील त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. आणि आपलं घर पुन्हा एकदा आपल्या आवडीप्रमाणे सजवा.
 
2. बिल आणि कागदपत्रे
खूप दिवसांपासून आपण हात लावले नसतील असे किती तरी कागदपत्रे आणि बिल उगाचच सांभाळलेले असतील. असे कागद नीट बघा आणि त्यातून बिनाकामाचे बिल आणि कागद फाडून फेका. आवश्यक कागद आणि बिलं फाइल करून व्यवस्थित जपून ठेवा. या दरम्यान आपण आपला बॉयोडेटा देखील अपडेट करू शकता.
 
3. आपली हेल्थ फाइल अपडेट करा
आरोग्या आहे तर जगभरातील सुख आहे. म्हणून वेळोवेळी आपलं आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना ज्या काही आरोग्यासंबंधी समस्या झाल्या असतील त्यांचे प्रिस्क्रिप्शन 
 
आपल्याकडे असल्यास त्यांना एकत्र करा. प्रत्येकाची एक वेगळी मेडिकल फाइल तयार करून त्यात वेगवेगळ्या डॉक्टरांनी दिलेली एडवाइजरी एकत्र करा. एका फाइल मध्ये मेडिकल संबंधी सर्व माहिती असल्याने डॉक्टरांना मेडिकल हिस्ट्री बघणे सोपं जातं.
 
4. नाती मजबूत करा
आपल्या कामात व्यस्त असताना इतर कुठेही लक्ष देता येत नाही अशात अनेक लोकांशी आपण नकळत दूर होत जातो. अशात लहानपणीचे मित्र, नातेवाईक, सहयोगी आणि शेजारच्यांशी फोनवर गप्पा मारणे सुखद ठरेल. एकमेकांचे सुख-दुःख जाणून संबंध मजबूत करा. आवश्यकता असल्यास मदतीचा हात पुढे करा. जीवनात नाती-संबंधच कामास येतात.
 
5. आपले छंद जपा
खूप काळापासून पुस्तकांवरील जमलेली धूळ साफ करण्याची वेळ आली आहे. आपला गिटार घरातील एखाद्या कोपर्‍यात ठेवलेला असेल, कलर- ब्रश वाळत असतील, आवडीचे पदार्थ तयार केले नसतील, माळ्याला सुर्पुद केलेला आपला बाग, किंवा कित्येक दिवसांपासून आपण म्युझिकचा आनंद घेतला नसेल तर ही वेळ या सर्वींकडे देण्याची आहे.
 
शौक काहीही असू शकतात, स्वत:साठी आणि आपल्या लोकांसाठी वेळ काढा. घरातून बाहेर निघू शकत नाही तरी घरात बसून आपल्या आवडीचे काम केल्याने देखील सुकून मिळवू शकता. ही यादी लांब देखील असू शकते आपल्या सुविधा आणि रुचीनुसार... आपण स्वत:वर आणि स्वत:च्या कुटुंबावर लक्ष देऊन ही वेळ साधू शकता.