बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (21:41 IST)

हवेत लग्न करणे महागात पडले DGCA ने ही कारवाई केली

नवी दिल्ली. रविवारी स्पाइसजेटच्या आकाशातील चार्टर्ड फ्लाइटवर अतिथी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, कोरोना मार्गदर्शक नियमांना धाब्यावर ठेण्यात आले. आता नागरी उड्डयन संचालनालयाने (डीजीसीए) कारवाई केली आहे. यामुळे लग्नात सामील झालेल्या पाहुण्यांचा त्रासही वाढू शकतो.
 
रविवारी पहाटे चार्टर्ड विमान मदुराई विमानतळा वरून निघाले आणि सुमारे 2 तास आकाशात चक्कर मारल्यानंतर पुन्हा परत आला. विमानात 160 लोक होते. नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्याने  सांगितले की, उड्डाण दरम्यान विमानात  सामाजिक अंतर नियमांचे पालन न केल्यामुळे सध्या विमानाच्या क्रूला ड्युटीवरून काढून टाकण्यात आले आहे.
 
या अधिकाऱ्याने  सांगितले की, स्पाइसजेटला विमानातच आपापसांत अंतर निर्माण करण्याच्या नियमांचे पालन न करणार्यां विरुद्ध संबंधित अधिकाऱ्यांकडे  तक्रार करण्याची सूचना देण्यात आली आहे. ते म्हणाले की डीजीसीए या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर 'कठोर कारवाई' करेल.
 
सोशल मीडियावर झालेल्या या लग्नाची छायाचित्रे सोमवारी व्हायरल झाली आणि त्याचे व्हिडिओ समोर आले. ह्याच्या मध्ये ती दृश्य आहे की वधू-वरांचे लग्न होत असताना पाहुणे एकमेकांच्या अगदी जवळ उभे आहेत .
 
यासंदर्भात विचारले असता स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, स्पाइसजेट बोईंग 737 हे ट्रॅव्हल एजंटने लग्नानंतर पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी बुक केले होते. कोविड मार्गदर्शक सूचनांविषयी ग्राहकास स्पष्टपणे सांगण्यात आले होते आणि उड्डाण दरम्यान कोणत्याही गतिविधीसाठी त्यांना मनाई होती. केवळ लग्नाच्या पाहुण्यांना हवाई सहलीसाठी उड्डाणांना मंजुरी देण्यात आली.
प्रवक्त्यांनी सांगितले की वारंवार विनंत्या करूनही नियमांची आठवण करुन देऊनही प्रवाश्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही आणि म्हणूनच एअरलाईन्स नियमांनुसार कारवाई करीत आहे.