Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ स्थलांतरित मजुरांना २ महिने मोफत मिळणार

Updated: शुक्रवार, 15 मे 2020 (07:21 IST)
 
देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजची आणखी काही वैशिष्ट्यं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली. त्यानुसार स्थलांतरित मजुरांना प्रत्येकी दरमहा ५ किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले जाणार आहे. तर प्रत्येक कुटुंबाला १ किलो हरभऱ्याची डाळ मोफत दिली जाणार आहे. २ महिने हे अन्नधान्य मोफत मिळणार आहे.
 
केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना याचा लाभ मिळणार आहे. सुमारे ८ कोटी मजुरांना याचा लाभ मिळेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. एक देश एक रेशन कार्ड योजनेच्या अंमलबजावणीची घोषणाही केली. त्यानुसार देशाच्या एका भागात काढलेल्या रेशन कार्डाच्या आधारे देशभरात कुठंही धान्य घेता येईल. ऑगस्ट २०२० पर्यंत २३ राज्यांमधल्या ६७ कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळेल. पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत सर्व रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळेल. 
 
फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या ५ हजार कोटी रुपयांच्या विशेष कर्ज योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. प्रत्येक फेरीवाल्याला या अंतर्गत १० हजार रुपयांपर्यंत भांडवल कर्जाऊ मिळणार आहे. डिजिटल पेमेंट करणाऱ्या आणि वेळेवर या कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्यांना अतिरीक्त लाभही दिले जाणार आहेत. सुमारे ५० लाख फेरीवाल्यांना याचा लाभ होण्याची आशा आहे. 
 
मुद्रा योजनेंतर्गत ५० हजारापर्यंतचे कर्ज घेतलेल्या छोट्या व्यावसायिकांपैकी वेळेवर हप्ते भरणाऱ्यांचे २ टक्के व्याज वर्षभरासाठी माफ केलं जाणार आहे. 
 
स्थलांतरितांच्या आवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भाड्यानं घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.  
 
पशुपालक आणि मच्छिमारांनाही आता किसान क्रेडिट कार्डाचे लाभ मिळू शकतील. सुमारे अडीच कोटी लोकांना याचा लाभ मिळू शकतो.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: गणेशोत्सवापूर्वी कोकणला भेट म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुंबई-सावंतवाडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

विरोध का? अभिजीत दीपके यांनी 'शाळा सुधारा' मोहिमेवरून भाजपवर निशाणा साधला

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अभिनंदन वर्धमान यांनी हवाई दल सोडले, मेजर ऋषभ संब्याल यांचीही मुदतपूर्व निवृत्ती

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; इराणसोबतचे युद्ध जास्त काळ टिकणार नाही

पुढील लेख
Show comments