शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मे 2020 (22:43 IST)

जळगाव जिल्ह्यातील 35 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटरमध्ये आजपर्यंत 42 हजार 947 व्यक्तींचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रिनिंग करण्यात आले आहे. तर 2 हजार 365 रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी 1683 रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 210 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अद्याप 440 अहवाल अप्राप्त आहे. तर जिल्ह्यातील 35 कोरोना बाधित रुग्ण कोरोनावर मात करुन घरी गेले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
 
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 2505 रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले आहे तर 1688 रुग्णांना होम क्वारंटाईन केले असून 1276 रुग्णांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 210 कोरोना बाधित रुग्णांपैकी 136 रुग्णांची प्रकृती स्थिर, 11 रुग्ण अत्यावस्थ असून 35 रुग्ण बरे झाले आहे तर 28 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
 
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित सर्वाधिक 102 रुगण अमळनेर तालुक्यात आढळून आले आहे तर भुसावळ 40 रुग्ण, जळगाव शहर 39 रुग्ण, पाचोरा 20 रुग्ण, चोपडा 6 रुग्ण तर भडगाव, जळगाव ग्रामीण व दुसऱ्या जिल्ह्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन रुगण आढळून आले आहे. तसेच अमळनेर तालुक्यातील 17, भुसावळ शहरातील 9, जळगाव शहरातील 6 तर पाचोरा शहरातील 3 असे एकूण 35 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर अमळनेर तालुक्यातील 10, भुसावळ तालुक्यातील 8, जळगाव शहरातील 4, चोपडा व पाचोऱ्यातील प्रत्येकी 3 प्रमाणे 28 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर सध्या अमळनेर तालुक्यातील 75, जळगाव शहरातील 29, भुसावळ शहरातील 23, पाचोरा शहरातील 14, चोपड्याचे 3 तर भडगाव, जळगाव ग्रामीण, व दुसऱ्या जिल्ह्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 147 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
 
जिल्ह्यातील नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक रहावे. लॉकडाऊनचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यंत आवश्यकता असेल तर घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करतांना सोशल डिस्टनिंगचे पालन करावे. दिवसातून चार/पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुवावे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.