शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (08:57 IST)

भारतात २० लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

भारतात करोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात आता करोनाग्रस्तांची संख्या २० लाख ६ हजार ७६० इतकी झाली आहे. भारत आता ब्राझिलच्या मागोमाग आहे. ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहेत. तर अमेरिकेत ५० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्णांची संख्या आहे. सकाळी ही संख्या १९ लाख ६५ हजार होती. मात्र देशभरात ५६ हजार नव्या रुग्णांची भर पडल्याने भारतातील करोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आत्तापर्यंत १३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर संपूर्ण देशात ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 
जगात ज्या देशांमध्ये करोनाचे रुग्ण आहेत त्यात भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त तर भारतात २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रशियात ८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतल्या रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे आहे. मेक्सिकोमध्ये ४ लाखांच्या पुढे रुग्णसंख्या आहे. पेरुमध्येही चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे. जगातल्या २०० पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे.