suvichar
✕

अदर पूनावाला यांनी 'कोविशील्ड' लस टोचून घेतली

Updated: शनिवार, 16 जानेवारी 2021 (15:45 IST)
 
कोरोनावरील लस कधी येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अँस्ट्रॉझेनिका कंपनीने विकसित केलेल्या कोव्हीशिल्ड लसीचे उत्पादन झाले. तीन टप्प्यामध्ये मानवी चाचण्या पार पडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर कोव्हीशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली. लसीकरणाला शनिवारी सुरुवात झाल्यानंतर पुनावाला यांनीही स्वतः लस टोचून घेतली. लस सुरक्षित असल्याचा संदेश त्यांनी या कृतीतून देशाला दिला आहे.
 
लसीकरण मोहीमेबद्दल मी संपूर्ण देशाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी यशस्वी लसीकरण मोहीम भारतात पार पडत आहे. कोव्हीशिल्डच्या यशामागे अनेकांचे परिश्रम आहेत. या यशाचा मला अभिमान वाटतो. लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, हा संदेश आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी लसीकरण करून घेत आहे, अशा आशयाचे ट्विट अदर पुनावाला यांनी केले आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

एफडीएची कारवाई पुणे विभागाकडून खाद्यतेल जप्ती

नागपूरमध्ये बोअरवेल खोदण्यावर तात्काळ बंदी, प्रशासनाचा मोठा निर्णय

भारतीय कर्णधार शुभमन गिल पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यातून बाहेर

LIVE: रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा आणि जंबो ब्लॉक जाहीर

उद्योग परवाना घोटाळ्यात एमपीसीबीच्या सहा अधिकाऱ्यांच निलंबन

पुढील लेख
Show comments