मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (15:42 IST)

कोरोना लसीचा ड्राय रन पार पडला, मात्र कोणत्याही व्यक्तीला कोविडची लस दिली नाही

पुण्यातील चिंचवड आणि मान येथील रुग्णालयातही कोरोना ड्राय रन पार पडली आहे. तिन्ही रुग्णालयात नोंदणीकृत 75 आरोग्य कर्मचाऱ्यांवर ही ड्राय रन करण्यात आली. मात्र अद्याप कोणत्याही व्यक्तीला कोविडची लस दिली गेलेली नाही.
 
सिरम इन्स्टिट्युटच्या कोविड लसीला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कोविड ड्राय रन घेण्यात आली. त्यात, पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवड शहरातील जिजामाता रुग्णालय आणि मान येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान ही ड्राय रन पार पडली. ज्या कर्मचाऱ्यांवर ड्राय रन घेतली गेली त्या आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच कोरोना लसीकरणासाठी तयार केलेल्या वेबसाईटवर नोंदणी केलेली होती. त्यांची मुलाखत घेण्यात आली, नंतर लसीकरण असलेल्या ठिकाणी बसवून त्यांची विचारपूस करत यात काय अडचणी येतात याविषयी आढावा घेण्यात आला आहे.