suvichar
✕

करोना संसर्गाने पुण्यातील कॉन्स्टेबलचा मृत्यू

Updated: शुक्रवार, 22 मे 2020 (07:02 IST)
पुण्यात काल ४३ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा करोनाच्या संसर्गानं मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पुणे पोलीस दलातील वाहतूक विभागात ते कार्यरत होते. १० मे पासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोनाबाधित असलेले पोलीस कॉन्स्टेबल हे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांचा मृत्यू झाला. पुणे पोलीस दलातील किमान २६ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यातील १४ पोलीस बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. पुणे पोलीस दलातील हा दुसरा बळी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ५७ वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला होता.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, नौदलाला ८ नवीन युद्धनौका मिळणार

नागपूरमध्ये मोठा अपघात; बांधकाम स्थळावर क्रेन कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू तर २ जखमी

LIVE: नागपूरमधील म्हाडाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत भीषण अपघात

सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, घेतली ८०,००० रुपयांची लाच! पालिका आयुक्तांना अटक

सोने आणि चांदीच्या किमती का घसरत आहे? सोने त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा ५१,००० रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदीच्या भावात २.३३ लाखांहून अधिक घसरण

पुढील लेख