Festival Posters
✕

राज्याला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, कोविड टास्क फोर्सने केलं सावध

Updated: शुक्रवार, 18 जून 2021 (11:49 IST)
 
कोविडच्या नियमांचं योग्य पालन न केल्यास एक ते दोन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती टास्क फोर्सनं व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी आवश्यक औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या  बैठकीत कोरोना व्हायरसचा डेल्टा प्लस व्हेरिएंट शिरकाव करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या खूपच जास्त होती. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेतही रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. 
 
कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत राज्यात सुमारे 19 लाख आणि दुसऱ्या लाटेत सुमारे 40 लाख रुग्णांची नोंद झाली. तसंच तिसऱ्या लाटेत कोरोनाचे 8 लाख सक्रिय रूग्णही दिसू शकतात, ज्यांपैकी त्यात दहा टक्के मुलांचा समावेश असू शकतो, असं आरोग्य अधिकाऱ्यानं म्हटलं आहे .
 
कोविड 19 च्या तिसर्‍या लाटेसाठी तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आरोग्य विभागानं संभाव्य परिस्थिती मांडली. बैठकीत संभाव्य औषधे, त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, आरटीपीसीआर कीट, मास्क, पीपीई किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा झाली.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: दिवाळीपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या १८,००० कर्मचाऱ्यांसाठी भेट

पुणे महापालिकेच्या १८ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट, २७ हजार रुपयांच्या बोनसचा प्रस्ताव मंजूर

उत्तराखंडमध्ये बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिकासह सहा जणांचा मृत्यू

रेल्वे पासधारकांसाठी आनंदाची बातमी; आता या प्रीमियम गाड्यांमध्ये उच्च वर्गात प्रवास करता येणार

१८७ किमी रेंज अन् २ लाखांहून अधिक ग्राहकांची पसंती! Hero VIDA ई-स्कूटरने TVS iQube, Chetak आणि Ather ला टाकले मागे

पुढील लेख
Show comments