बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (09:14 IST)

राज्यात एकाच दिवसात वाढलेत जास्त रुग्ण… ही आहे चिंता वाढवणारी आकडेवारी

राज्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे, कारण राज्यात ओमिक्रॉनचा विस्फोट झाला आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या विक्रमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
ओमिक्रॉन रुग्णसंख्येनं रविवारी नवा उच्चांक गाठला असून नव्या 31 रुग्णांची दिवसभरात नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 141 रुग्णांची नोंद करण्यात आली.
ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. राज्यातील 31 पैकी 27 रुग्णांचं निदान एकट्या मुंबईत झालं आहे. दरम्यान,  मुंबईतील कोरोना रुग्णवाढ ही चिंताजनक मानली जाते आहे.
देशभरात ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढतेय !
देशभरात देखील दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. देशातील एकूण 17 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. तर आता संपूर्ण देशभरात ओमायक्रॉमन रूग्णांची संख्या 422 वर जाऊन पोहोचली आहे.
महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर गुजरात आणि तेलंगणामध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्याचसोबत आंध्र प्रदेशात ओमायक्रॉनची आणखी दोन प्रकरणं समोर आली आहेत.भारतात सौम्य संसर्गासह फैलावणार ओमायक्रॉन भारतामध्ये ओमायक्रॉनच्या संसर्गाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. तसेच देशात हाय पॉझिटिव्हिटी रेट दिसू शकतो. मात्र दक्षिण आफ्रिकेप्रमाणे भारतातही बहुतांश लोकांमध्ये याचा सौम्य संसर्ग दिसून येईल, असा दावा ओमायक्रॉन व्हेरिएंटला पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या डॉक्टर एंजेलिके कोएट्झी यांनी हा दावा केला आहे.दक्षिण आफ्रिका मेडिकल असोसिएशनच्या चेअरपर्सन असलेल्या कोएट्झी यांनी सांगितले की, सध्याच्या लसी ह्या संसर्गाला निश्चितपणे नियंत्रित करतील. मात्र लस न घेणाऱ्यांना १०० टक्के धोका आहे.