suvichar
✕

दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे परेशान टीम इंडियासाठी चांगली बातमी

Updated: बुधवार, 26 जून 2019 (11:30 IST)
 
पाकिस्‍तानविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर कुमारला डाव्या पायाच्या स्नायूंच्या ताण जाणवल्यामुळे मधून बाहेर पडावं लागलं होतं. तेव्हा तो दोन-तीन सामन्यात खेळू शकणार नाही असे सांगण्यात आले होते. भुवनेश्वर कुमारने या वर्ल्ड कपच्या 3 सामन्यातून 5 विकेट घेतले आहे.
 
भुवनेश्वर स्नायूंच्या ताणामुळे परेशान होतो. बीसीसीआयने एक ट्विट केले आहे ज्यात भुवनेश्वर कुमार गोलंदाजीचा अभ्यास करताना दिसत आहे. तरी नेट प्रॅक्टिसमध्ये तो पूर्ण रनअपहून गोलंदाजी करताना दिसत आहे. भुवनेश्वर कुमार पाकिस्तानविरुद्ध खेळताना जखमी झाला होता.
 
टीम इंडियाला पुढील सामना गुरुवारी 27 जून रोजी वेस्टइंडीज विरुद्ध असून भुवनेश्वर त्यात खेळणार अथवा नाही हे स्पष्ट झालेले नाही. अफगाणिस्तानाविरुद्ध सामन्यात भुवनेश्वरच्या जागी सामील शमीने उत्तम गोलंदाजी करत हॅट्रिक केली होती.
 
भुवनेश्वर वेस्टइंडीजविरुद्ध सामन्यापूर्वी फिट झाला तरी त्याला संघात शमीच्या जागेवर घेतल्या जाण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
 
नवदीप सैनी देखील टीम इंडियाला जुळले होते. भुवनेश्वरच्या कव्हर रूपात तो इंग्लंड पोहचल्या असल्याचे सांगण्यात येत होते. परंतू नंतर सैनी नेट गोलंदाज रूपात टीमसोबत जुळले असल्याचे प्रंबधनाने स्पष्ट केले होते. सैनी स्टँडबाय रूपात निवडले गेले आहे.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

दिल्लीने आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी नितीश राणाला तर मयंक आणि श्रेयस यांनाही वगळण्यात आले

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला

आयसीसीकडून मोठी घोषणा, विश्वचषक पात्रता फेरीचे सामने नेपाळमध्ये होणार; वेळापत्रक जाहीर

जसप्रीत बुमराह आणि हे ३ भारतीय क्रिकेटपटू उद्या लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करतील

ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिनला प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनासाठी एका महिन्यासाठी निलंबित केले

पुढील लेख
Show comments