Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दासबोध दशक तेरावा - नामरूप

Updated: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (12:01 IST)
 
 
समास नववा : आत्माविवरण ॥ श्रीराम ॥ आत्मयास शेरीरयोगें । उद्वेग चिंता करणें लागे । शरीरयोगें आत्मा जगे । हें तों पगटचि आहे ॥ १ ॥ देह अन्नचि खायेना । तरी आत्मा कदापि जगेना । अत्म्याविण चेतना । देहास कैंची ॥ २ ॥ हें येकावेगळें येक । करूं जातां निरार्थक । उभयेयोगें कोणीयेक । कार्य चाले ॥ ३ ॥ देहाला नाहीं चेतना । अत्म्यास पदार्थ उचलेना । स्वप्नभोजनें भरेना । पोट कांहीं ॥ ४ ॥ आत्मा स्वप्नावस्थेंत जातो । परंतु देहामध्यें हि असतो । निदसुरेपणें खाजवितो । चमत्कार पाहा॥ ५ ॥ अन्नरसें वाढे शरीर । शरीरप्रमाणें विचार । वृद्धपणीं तदनंतर । दोनी लाहानाळती ॥ ६ ॥ उत्तम द्रव्य देह खातो । देहयोगें आत्मा भुलतो । विस्मरणें शुद्धि सांडितो । सकळ कांहीं ॥ ७ ॥ देहानें घेतलें वीष । आत्मा जाये सावकास । वाढणें मोडणें आत्मयास । नेमस्त आहे ॥ ८ ॥ वाढणें मोडणें जाणें येणें । सुख दुःख देहाचेनि गुणें । नान प्रकारें भोगणें । आत्मयास घडे ॥ ९ ॥ वारुळ म्हणिजे पोकळ । मुंग्यांचे मार्गचि सकळ । तैसेंचि हें केवळ । शरीर जाणावें ॥ १० ॥ शरीरीं नाडीच खेटा । नाडीमध्यें पोकळ वाटा । लाहान थोर सगटा। दाटल्या नाडी ॥११ ॥ प्राणी अन्नोदक घेतो । त्याचा अन्नरस होतो । त्यास वायो प्रवर्ततो । स्वासोस्वासें ॥ १२ ॥ नाडीद्वारां धांवे जीवन । जीवनामधें खेळे पवन । त्या पवनासरिसा जाण । आत्माहि विवरे ॥ १३ ॥ तृषेनें शोकलें शरीर । आत्म्यास कळे हा विचार । मग उठवून शरीर । चालवी उदकाकडे ॥ १४ ॥ उदक मागे शब्द बोलवी । मार्ग पाहोन शरीर चालवी । शरीर अवघें च हालवी । प्रसंगानुसार ॥ १५ ॥ क्षुधा लागते ऐसें जाणतो । मग देहाला उठवितो । आच्यावाच्या बोलवितो । ज्यासी त्यासी ॥ १६ ॥ बायेकांत म्हणे जालें जालें । देह सोवळें करून आणिलें । पायांत भरून चालविलें । तांतडीं तांतडीं ॥ १७ ॥ त्यासी पात्रावरी बैसविलें । नेत्रीं भरोन पात्र पाहिलें। हाताकरवीं आरंभिलें । आपोशन ॥ १८ ॥ हाताकरवीं ग्रास उचलवी । मुखी जाऊन मुख पसरवी । दातांकरवीं चाववी । नेटें नेटें ॥ १९॥ आपण जिव्हेमधें खेळे । पाहातो परिमळसोहळे । केंस काडी खडा कळे । तत्काळ थुंकी ॥ २० ॥ आळणी कळतां मीठ मागे । बायलेसि म्हणे आगे कांगे । डोळे ताऊन पाहों लगे । रागें रागें ॥ २१ ॥ नाना अन्नचि गोडी । नाना रसें स्वाद निवडी । तिखट लागतां मस्तक झाडी । आणी खोंकी ॥ २३ ॥ मिरपुडी घातली फार । कायसें करितें खापर । जिव्हेकरवीं कठिणोत्तर । बोलवी रागें ॥ २४ ॥ आज्य उदंड जेविला । सवेंच ता।म्ब्या उचलिला । घळघळां घेऊं लागला। सावकास॥ २५ ॥ देहीं सुखदुःखभोक्ता । तो येक आत्माचि पाहातां । आत्म्याविण देह वृथा । मडें होये ॥ २६ ॥ मनाच्या अनंत वृत्ति । जाणणें तेचि आत्मस्थिति । त्रैलोकीं जितुक्या वेक्ती । तदांतरीं आत्मा ॥ २७ ॥ जगामध्यें जगदात्मा । विश्वामधें विश्वात्मा । सर्व चालवी सर्वात्मा । नाना रूपें ॥ २८ ॥ हुंगे चाखे ऐके देखें । मृद कठिण वोळखे । शीत उष्ण ठाउकें । तत्काळ होये ॥ २९ ॥ सावधपणें लाघवी । बहुत करी उठाठेवी । या धूर्ताच्या उगवी । धूर्तचि करी ॥ ३० ॥ वायोसरिसा परिमळ येतो । परि तो परिमळ वितळोन जातो । वायो धुळी घेउनी येतो । परी ते हि जाये ॥ ३१ ॥ शीत उष्ण वायोसरिसें । सुवासें अथवा कुवासें । असिजे परी सावकासें । तगणें न घडे ॥ ३२ ॥ वायोसरिसे रोग येती । वायोसरिसी भूतें धांवती । धूर आणी धुकटें येती । वायोसवें ॥ ३३ ॥ वायोसवें कांहींच जगेना । आत्म्यासवें वायो तगेना । आत्म्याची चपळता जाणा । अधिक आहे ॥ ३४ ॥ वायो कठिणास आडतो । आत्मा कठिण भेदून जातो । कठिण पाहों तरी तो । छेदेहिना ॥ ३५ ॥ वायो झडझडां वाजे । आत्मा कांहींच न वाजे । मोनेंचि अंतरीं समजे । विवरोन पाहातां ॥ ३६ ॥ शरीरास बरें केलें । तें आत्मयास पावलें । शरीरयोगें जालें । समाधान ॥ ३७ ॥ देहावेगळे उपाये नाना । करितां आत्मयास पावेना । समाधान पावे वासना । देहाचेनि ॥ ३८ ॥ देहआत्मयाचें कौतुक । पाहों जातां हें अनेक । देहावेगळी आडणुक । आत्मयास होये ॥ ३९ ॥ येक असतां उदंड घडे । वेगळें पाहातां कांहींच न घडे । विवेकें त्रिलोकीं पवाडे । देहात्मयोगें ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मविवरणनाम समास नवावा ॥
 
 
समास दहावा : शिकवणनिरूपण ॥ श्रीराम ॥ पालेमाळा सुमनमाळा । फळमाळा बीजमाळा । पाषाणमाळा कवडेमाळा । सुत्रें चालती ॥ १ ॥ स्फटिकमाळा मोहरेमाळा । काष्ठमाळा गंधमाळा । धातुमाळा रत्नमाळा । जाळ्या वोलि चांदोवे ॥ २ ॥ परी हें तंतूनें चालतें। तंतू नस्तां विष्कळीत होतें। तैसें म्हणों आत्मयातें। तरी साहित्य न पडे ॥ ३ ॥ तंतूस मणी वोविला। तंतूमध्येंचि राहिला । आत्मा सर्वांगीं व्यापला । पाहाना कां॥ ४ ॥ आत्मा चपळ सहजगुणें । दोरी काये चळों जाणे । म्हणोन दृष्टांत देणें । साहित्य न घडे ॥ ५ ॥ नाना वल्लींत जळांश । उसांमध्यें दाटला रस । परी तो रस आणी बाकस । येक नव्हे ॥ ६ ॥ देही आत्मा देह अनात्मा । त्याहून पर तो परमात्मा । निरंजनास उपमा । असेचिना ॥ ७ ॥ रायापासून रंकवरी । अवघ्या मनुष्यांचियां हारी । सगट समान सरी । कैसी करावी ॥ ८ ॥ देव दानव मानव । नीच योनी हीन जीव । पापी सुकृति अभिप्राव । उदंड आहे ॥ ९ ॥ येकांशें जग चाले । परी सामर्थ्य वेगळालें । येकासंगे मुक्त केलें । येकासंगें रवरव ॥ १० ॥ साकर माती पृथ्वी होये । परी ते माती खातां न ये । गरळ आप नव्हे काये । परी तें खोटें ॥ ११ ॥ पुण्यात्मा आणी पापात्मा । दोहिंकडे अंतरात्मा । साधु भोंदु सीमा । सांडूंच नये ॥ १२ ॥ अंतर येक तों खरें । परी सांगातें घेऊं न येती माहारे । पंडित आणि चाटें पोरें । येक कैसीं ॥ १३ ॥ मनुष्य आणि गधडे । राजहंस आणि कोंबडें । राजे आणि माकडें । एक कैसीं ॥ १४ ॥ भागीरथीचें जळ आप । मोरी संवदणी तेंहि आप । कुश्चिळ उदक अल्प । सेववेना ॥ १५ ॥ याकारणें आचारशुद्ध । त्याउपरी विचारशुद्ध । वीतरागी आणि सुबुद्ध । ऐसा पाहिजे ॥ १६ ॥ शूरांहून मानिलें लंडी । तरी युद्धप्रसंगीं नरकाडी । श्रीमंत सांडून बराडी । सेविता कैसें ॥ १७ ॥ येका उदकें सकळ जालें । परी पाहोन पाहिजे सेविलें । सगट अवघेंच घेतलें । तरी तें मूर्खपण ॥ १८॥ जीवनाचेंच जालें अन्न । अन्नाचें जालें वमन । परी वमनाचें भोजन । करितां न ये ॥ १९॥ तैसें निंद्य सोडूनद्यावें । वंद्य तें हृदईं धरावें । सत्कीर्तीनें भरावें। भूमंडळ ॥ २० ॥ उत्तमांसि उत्तम माने। कनिष्ठांस तें न माने । म्हणौन करंटे देवानें । करून ठेवले ॥ २१ ॥ सांडा अवघें करंटपण । धरावें उत्तम लक्षण । हरिकथा पुराण श्रवण । नीति न्याये ॥२२ ॥ वर्तयाचाविवेक । राजी राखणें सकळ लोक । हळुहळु पुण्यलोक। करीत जावे॥ २३ ॥ मुलाचे चालीनें चालावें । मुलाच्या मनोगतें बोलावें । तैसें जनास सिकवावें । हळुहळु ॥ २४ ॥ मुख्य मनोगत राखणें । हेंचि चातुर्याचीं लक्षणें । चतुर तो चतुरांग जाणें । इतर तीं वेडीं ॥ २५ ॥ वेड्यास वेडें म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये। तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥ २६॥ उदंड स्थळीं उदंड प्रसंग । जाणोनि करणें येथासांग । प्राणिमात्राचा अंतरंग । होऊन जावें ॥ २७ ॥ मनोगत राखोन जातां । परस्परें होये अवस्ता । मनोगत तोडितां वेवस्तां । बरी नाहीं ॥ २८ ॥ याकारणें मनोगत । राखेल तो मोठा महंत । मनोगत राखतां समस्त । वोढोन येती ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शिकवणनिरूपणनाम समास दहावा ॥ ॥ दशक तेरावा समाप्त ॥ 

सर्व पहा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

दिव्यांच्या अवसेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख