suvichar

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय ३३

ती आनंद भावे नमुनि । म्हणे काल भेटला मुनि । गुरु बोले मग हांसोनी । पालटोनी रुप मी आलो ॥
तुझें परप्रेम पाहिलें । रुद्राक्ष मींच दिल्हे । रुद्रतीर्थें वाचविलें । ऐक बालें नवल हें ॥२॥
अवश्यं हे ल्यावे सादर । पूर्वीं काश्मीरेशकुमार । प्रधानाचाही कुमार । अलंकार टाकून देती ॥३॥
त्या भ्रांत्या पिसे म्हणती । भस्मरुद्राक्षातें धरिती । पराशरा पुसे नृपति । हेतू वदति मुनी भूपा ॥४॥
सर्वात्म शिवा हे भजती । नंदिग्रामीं वेश्यासती । वैश्यरुपें गौरीपती । ये ती प्रती वळखावया ॥५॥
अनन्य स्त्रीत्र्यह होऊन । रतिदानें घे लिंग कंकण । तो बोले लिंगनाशन । होतां प्राण त्यजीन मी ॥६॥
त्याच्या वचना मानून । मंडपीं ठेवी लिंगरत्‍न । रमे वेश्या गृहीं नेऊन । जळे लिंगासह मंडप ॥७॥
वैश्य स्थिरवून मन । लिंग जळाले पाहून । करी अग्निप्रवेशन । सर्व दान देई वेश्या ॥८॥
निघे तंव लोक म्हणती । वेश्ये घरीं किती येती । कोणाची तूं कशी सती । नायकतां ती आग रिघे ॥९॥
तैं होय शिव प्रसंन्न । तिला नेयी उद्धरुन । तिणे जे रुद्राक्ष ल्येवून । कुक्कुट मर्कट पाळिले ॥१०॥
इति श्री०प०प०वा०स०वि० रुद्राक्षमहिमावर्णनं नाम त्रयस्त्रिंशो०

सर्व पहा

'Shiva Manas Pooja' मन शांत करणारी 'शिव मानस पूजा'

अजूनही हे प्रमुख पारंपरिक उपाय बाळाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी केले जातात

भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत लोक गर्भनाळ फेकून देत नाहीत, परंपरा काय आहे ते जाणून घ्या

Bhadli Navami 2026: भादली नवमी कधी आहे? जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि न पाहता मुहूर्त शुभ कार्य करण्याची वेळ!

Apsara Stotra श्री अप्सरा स्तोत्र : आध्यात्मिक उन्नती आणि शुभफल देणारे पवित्र स्तोत्र

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख