भाऊबीज: सण साजरा करण्याची योग्य पद्धत
कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भावाने बहिणीकडे जावे.
शक्य असल्यास भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी.
बहिणीने शुभ मुहूर्त बघून भावाला ओवाळावे.
ओवळताना भावाचे मुख पूर्वीकडे असावे.
ओवळ्यानंतर यमाच्या नावाने चौमुखी दिवा लावून उबंरठ्याबाहेर ठेवावे.
बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे.
जेवणात तांदूळाचा पदार्थ अवश्य असावा.
एखाद्या स्त्रीला भाऊ नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे.
भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.