suvichar

दिवाळी लक्ष्मीपूजन आरती

Updated: मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025 (09:16 IST)
महिषासुरनिर्दळण प्रथम केलेसी ।
शुंभरक्तबीज तेही वधिलेसी ॥
सर्वहि असुरी मर्दुनि स्वस्थ जाहलिसी ।
सुराधिकारी इंद्रा त्वा स्थापियसी ॥ जय. ॥
भजन करितां तुझे मुक्ति पै देसी ।
इहलोकीं सुखभोग भक्तां ओपीसी ॥
जनार्दन वदला परम भावेंसी ।
वरदहस्त माथां ठेवीं भक्तासी ॥
जय देवी जय देवी. ॥ ४ ॥
 
****************
महालक्ष्मी करविर क्षेत्री ज्योतीरूप आहे ।
जवाउणें काशी प्रयागवटिं गंगा आहे ॥ धृ. ॥
मारुनि कोल्हासूर दैत्य दत्तात्रय गुरु मा ।
माया लावुनि विश्व भोंदी भजना लावी मा ॥
मान भक्तांजवळुन घेई गोंधळ घाली मा ।
माया स्त्रियांवर आहेम अविनाप्रतिमा ॥ १ ॥
हारूनी दु:ख पाप अवघें पुण्यवंत जीव हा ।
हा नायक विश्वरूपी कीर्तन गाती हा ।
हा दिनाचा अन्नदाता अंतरसाक्षी हा ॥
हा येऊनी भेट देई शांत करी हा ॥ २ ॥
ललित अलंकार पुतळ्या कानीं तोंगल ।
ललित माजी राखडी माथां घालुनी मूदल ॥
लहान थोर तुजला ध्याती स्मरणें करितील ।
लमाजी बहुसुंदर दाब चरणीं सांखळ्याल ॥ ३ ॥
क्षुद्र न भूतें जवळून येती भये पळता क्षू ।
क्षु आदिशक्तीच्य़ा क्रोधे काळजळे क्षू ॥
क्षु रंकाळ्यामध्ये रेऊन रत्नखचित क्षू ।
क्षु पाण्याचा अंत न लागे कमळे फुलती क्षू ॥ ४ ॥
मी अंबिका देवा वडिल चंडमुंड मारी मी ।
मी वेदांची माता म्हणवुनि शास्त्र पुराणी मी ॥
मी जन्ममरण चुकवी योगियांचे ध्यानीं मीं ।
मी परशुरामाची स्वामिण अजरामर करी मी ॥ ५ ॥
 
****************
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
 
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी...॥
 
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी...॥
 
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी...॥
 
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी...॥
 
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी...॥
 
****************
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी  |
ओवाळीते आरती वंदिते मी || धृ ||
 
हाती कडे पायी तोडे पैजनाची रूणझुण
नथकूडी बाळी बुगडी कंकणाची झुमझुम
मधुर झनीच्या नादामध्ये भक्ताघरी चालली
सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली ||1||
 
सालु हिरवा शेला पिवळा चोळी जरी गं बुट्याची 
वेणी फणी भांग भरूनी जाळी भरली मोत्याची 
चंद्रकोरीच्या आकाराने काजळ कुंकू ल्याली 
सोनियाच्या पावलाने || 2 ||
 
ताट वाट्या चांदिच्या गं सिशमाचा पाट गं 
सोळा भाज्या सोळा चटण्या भोजनाचा थाट गं 
मधुर झनीच्या नादामध्ये भक्ताघरी चालली 
सोनियाच्या पावलाने | 3 ||
 
भक्ता घरची आंबील कथली आवडे गं तुला 
प्रेमासाठी आघाडा केना पावन तु गं केला 
बैस आली जेवायला पूर्ण पोळी वाढली 
सोनियाच्या पावलाने || 4 ||
 
निरंतर कृपा असु दे आई आपुल्या भक्तावर 
अखिल जगाचा तुच आहे गं आधार 
अंबीके गं तुझ्या पाई डोई मी गं ठेवीली 
सोनियाच्या पावलाने || 5 ||
 
****************

सर्व पहा

एकादशीला श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्र वाचनाचे महत्व; सर्व संकटे व त्रास दूर होतील

रक्षाबंधन विशेष प्रसंगासाठी घरीच क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक बनवा

श्रावण पुत्रदा एकादशी व्रत २०२६: तारीख, शुभ वेळ, पारणा आणि संपूर्ण पूजा विधी

एकादशी विशेष: भगवान विष्णूंना प्रसन्न करणारी ५ अत्यंत फलदायी स्तोत्रे

चाणक्य नीती : नातेवाईकांच्या घरी जाताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments