Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वसुबारसला गाई-वासराचे पूजन का केले जाते? कथा आणि महत्त्व जाणून घ्या

Updated: बुधवार, 8 ऑक्टोबर 2025 (12:22 IST)
- ग्रामीण भागात किंवा ज्यांच्या घरी गुरे, गाई-वासरू आहेत, त्यांनी वसुबारस या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करुन गाई-वासराला नैवेद्य दाखवावे.
- या दिवशी बाजरीची भाकरी, गवारची भाजी आणि गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात.
- हे सर्व पदार्थ गाई-वासराला खाऊ घातले जातात.
- या दिवशी गाईचे दूध, किंवा दुधाने तयार पदार्थ तसेच गहू आणि तांदूळ खाण्यास मनाई आहे. 
- या दिवशी व्रत करणार्‍यांनी थंड बाजरीची भाकरी खावी. तसेच अंकुरलेले धान्य जसे मूग, हरभरा इत्यादींचे स्वीकार करून त्यापासून बनवलेला प्रसाद अर्पण करावा.
ALSO READ: Diwali 2025: यंदा दिवाळी कधी आहे? वसुबारस ते भाऊबीज तारखा याबद्दल माहिती
वसुबारस कथा
आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होतीं. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळीं, मुगाळीं वासरं होतीं.
 
एके दिवशीं काय झालं ? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशीं म्हातारी सकाळीं उठली, शेतावर जाऊं लागली. सुनेला हांक मारली, मुली मुली इकडे ये ! सून आली, काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जातें. दुपारीं येईन. तूं माडीवर जा, गव्हाचे, मुगांचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं.
 
आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली. गहूं मूग काढून ठेवले. खालीं आली, गोठ्यांत गेली. गव्हाळीं मुगाळीं वसरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारलीं, चिरलीं व शिजवून ठेवून सासूची वाट पहात बसलीं. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूनं देखलं. तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय म्हणुन सुनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजतां चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशीं जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा कर ! गाईवासरं जिवंत कर ! असं न होईल तर संध्याकाळीं मीं आपला प्राण देईन ! असा निश्चय केला.
 
देवापाशीं बसून राहिली. देवानं तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण देखिलं. पुढं संध्याकाळीं गाई आल्या. हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाहीं असं देवास वाटलं. मग देवान काय केलं ? गाईचीं वासरं जिवंत केलीं. तीं उड्या मारीत मारीत प्यायला गेलीं. गाईंचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गाईगोर्‍ह्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली. आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊं. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं, देवाब्राह्मणाचे दारीं, पिंपळाच्या पारीं, गाईंच्या गोठी सुफळ संपूर्ण.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

Krishna Janmashtami 2026 Wishes in Marathi श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

जन्माष्टमीला बनवा या ५ चविष्ट पाककृती; चव अशी की सर्वजण पोट भरून खातील

कृष्ण जन्माष्टमीला करा तुळशीचे 'हे' सोपे उपाय; घरात नांदेल समृद्धी आणि मिळेल देवी लक्ष्मीची कृपा!

जन्माष्टमी निमित्त मुलांसाठी भगवान श्रीकृष्णाची १० आधुनिक, युनिक आणि अर्थपूर्ण नावे

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! माटुंगा जीएसबी सेवा मंडळाचे ₹७०३.२७ कोटींचे विक्रमी विमा संरक्षण

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments