Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लक्ष्मी उपासना

Updated: सोमवार, 12 ऑक्टोबर 2009 (16:23 IST)
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची उपासना अत्यंत श्रेष्ठ मानली गेली आहे. घराघरांत लक्ष्मीची पूजा-अर्चना केली जाते. लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे. 'शतपथ ब्राह्मण' ग्रंथात लक्ष्मीची एक कथा आहे. त्यानुसार प्रजापती हा लक्ष्मीचा पिता. लक्ष्मीचा जन्म अतिशय सुंदर आणि गुणवान देवीच्या रूपात झाला आहे. तिच्या सौंदर्याची कीर्ती एवढी पसरली होती की स्वर्गातील देवताही तिच्याकडे असुयायुक्त भावनेने तिच्याकडे पाहत. शेवटी तर असे होऊ लागले, की या अप्रतिम निर्मितीच नष्ट करून टाकावी, असा विचार इर्षेपोटी या देवांच्या मनात येऊ लागला.

अखेर प्रजापित्याने या देवतांना रोखले आणि एका स्त्रीचा असा नाश करणे शोभत नाही, असे त्यांना सुनावले. लक्ष्मीच्या ज्या गुणांमुळे हे सगळे होत आहे, ते गुण काढून घ्या, असा उपाय त्यांनी सुचवला. या देवदेवतांनी अखेर लक्ष्मीचे भोजन, सत्ता, सृष्टी, उच्चस्थान, शक्ती, पवित्र तेज, घर, वैभव आणि सौंदर्य हिरावून घेतले. हे सगळे गेल्यानंतर लक्ष्मी आपल्या पित्याला म्हणजे प्रजापतीला शरण गेली. प्रजापतीने सर्व दहा देवतांना प्रसन्न करून घे असा सल्ला लक्ष्मीला दिला. लक्ष्मीने तसेच केले. यज्ञ अनुष्ठानाद्वारे देवदेवतांना प्रसन्न करून आपले गुणावलेले सर्व गुण परत मिळविले.

थोडक्यात, प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती आणि त्याचे रक्षण स्वतःलाच करावे लागते मग ती व्यक्ती देवी देवता का असोनात, असा संदेश या कथेतून देण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

Show comments