Daily Horoscope
✕

थंडावा देणारी आणि पौष्टिकही शाही थंडाई रेसिपी; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नक्कीच बनवा

Updated: शनिवार, 14 फेब्रुवारी 2026 (15:10 IST)
 

शाही थंडाई रेसिपी 

थंडाई मसाला तयार करण्यासाठी 
साहित्य-
 बदाम-१५-२०
काजू-१०-१२
पिस्ते- १०-१२
कलिंगडाच्या बिया-२ मोठे चमचे
खसखस-१ मोठा चमचा
बडिशेप- १ मोठा चमचा
काळी मिरी- ८-१० दाणे
वेलची- ५-६ नग
वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या-१ मोठा चमचा
केशर- ७-८ काड्या
 
थंडाई बनवण्यासाठी इतर
साहित्य-
दूध-१ लिटर  
साखर-अर्धी वाटी (किंवा चवीनुसार)
 
कृती-
सर्वात आधी वरील सर्व मसाल्याचे साहित्य कोमट पाण्यात किमान ४ ते ५ तास भिजत ठेवा.   भिजवलेले सर्व साहित्य पाणी निथळून मिक्सरमध्ये घ्या. त्यात थोडे दूध घालून एकदम गुळगुळीत पेस्ट तयार करा. एका मोठ्या पातेल्यात १ लिटर दूध गरम करायला ठेवा. त्यात साखर आणि केशराच्या काड्या घाला. दुधाला एक उकळी आली की गॅस मध्यम करा. तयार केलेली थंडाईची पेस्ट दुधात घाला आणि ५-७ मिनिटे मंद आचेवर सतत हलवत राहा, जेणेकरून मसाल्याचा स्वाद दुधात उतरेल. दूध थोडे घट्ट झाले की गॅस बंद करा. थंडाई पूर्णपणे गार होऊ द्या. त्यानंतर तिला किमान २-३ तास फ्रिजमध्ये ठेवा. थंडगार थंडाई ग्लासमध्ये ओता. वरून गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घालून सजवा.
 

खास टिप्स 

गाळून घेणे: जर तुम्हाला थंडाई एकदम स्मूथ हवी असेल, तर सर्व्ह करण्यापूर्वी ती सुती कापडाने किंवा गाळणीने गाळून घ्या.

गुलाबाचा स्वाद: अधिक चांगल्या सुगंधासाठी तुम्ही यात १ चमचा गुलकंद किंवा रोझ सिरप देखील घालू शकता.

इन्स्टंट पद्धत: जर वेळ कमी असेल, तर वरील मसाल्याची पावडर करून ती दुधात उकळूनही थंडाई बनवता येते.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: महाशिवरात्रीला बनवा दोन प्रकारच्या थंडाई

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

हिवाळ्याच्या संध्याकाळी ५ पौष्टिक भाज्यांचे सूप बनवा, चवीसोबतच आरोग्याचीही काळजी घ्या

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मंत्र; प्रत्येक जेवणानंतर केवळ १० मिनिटे पायी चाला

Bhavpurna Shradhanjali in Marathi Images भावपूर्ण श्रद्धांजली संदेश इमेजेस

Margashirsha Guruvar 2026 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरूवार शुभेच्छा संदेश

पुढील लेख
Show comments