Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणेशपुराणात शमीपूजनाची दिलेली कथा

Updated: बुधवार, 5 ऑक्टोबर 2011 (14:40 IST)
मालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू मिळवता येत. त्याला शमी नावाची मुलगी होती. धौम्य ऋषींचा मुलगा मंदार याच्याबरोबर तिचे लग्न झाले. पुढे तारूण्यात शमी व मंदार एकत्र राहू लागले. एके दिवशी शौनक ऋषींकडे हे जोडपे जात असताना वाटेत त्यांना महागाणपत्य भृशुंडी मुनींचा आश्रम लागला. त्यांच्या भालप्रदेशावर गणपतीच्या कृपाप्रसादाने सोंड वाढली होती. ती पाहून दाम्पत्याला हसू आले. त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी शाप दिला आणि दोघेही वृक्ष झाले.

पुढे त्यांची ही अवस्था लक्षात आल्यानंतर और्व ऋषींनी व शौनकाने घोर तपश्चर्या करून गणरायासा प्रसन्न करून घेतले व शमी आणि मंदार यांना मानवदेह देण्याची प्रार्थना केली. परंतु, भृशुंडी हा आपला परमभक्त असल्याने त्याला दुखावणे बरे नाही, असे मानून गणपतीने शमी व मंदार यांची कीर्ती दिगंत होईल, लोक त्यांची पूजा करतील, असा वर दिला. शौनक ऋषी त्यावर संतुष्ट झाले. पण और्व ऋषी शमी वृक्षात प्रवेश करून त्यात अग्निरूपाने राहिले. शमीच्या समिधा होमासाठी आवश्यक असतात. त्यांच्या घर्षणातून अग्नी निर्माण होतो. शमीपत्र व मंदार पुष्प वाहिल्यास शंकर संतुष्ट होतो, असे मानतात. पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्याच झाडावर ठेवली होती.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

कोण होते महादेवाचे ते ८ महान भक्त? ज्यांना खुद्द भोलेनाथांनी दिले अमरत्वाचे वरदान!

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

Show comments