ganesh chaturthi
✕

Friendship Day Wishes 2026 in Marathi : मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

Updated: रविवार, 2 ऑगस्ट 2026 (10:15 IST)
तुझ्याशिवाय माझी story अधुरी आहे,
तू माझा best friend नाही, तू माझं दुसरं मन आहेस.
हैप्पी फ्रेंडशिप डे!

मैत्रीचं नातं रक्ताचं नसतं,
पण रक्तापेक्षा घट्ट असतं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात
पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री हसवणारी असावी,
मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.

काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैत्रीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैत्री असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक भास जो कधीही दुखावत नाही आणि
एक गोड नातं जे कधी संपतच नाही
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुठलंही नातं नसताना
आयुष्यभर साथ देते ती मैत्री
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जन्म हा थेंबासारखा असतो
आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं
मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
कारण, मैत्रीला शेवट नसतो
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते,
दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची गरज नसते
त्यालाच मैत्री म्हणतात
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते आज आहे
तसेच उद्या राहील…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

आयुष्य सुंदर आहे कारण
माझ्यासोबत तुझी साथ आहे.
जगात मैत्रीपेक्षा पवित्र काहीच नाही. हॅपी फ्रेंडशिप डे!

सुखात साथ देणारे आणि दुःखात पाठीशी उभे राहणारे
मोजकेच लोक नशीबाने लाभतात,
त्यापैकी एक तू आहेस. मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

रक्ताचे नाते नसतानाही जे नाते मनापासून जपले जाते, ते म्हणजेच 'मैत्री'
माझ्या अशाच एका खास मित्राला/मैत्रिणीला फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा!

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपली मैत्री अशीच कायम राहो!

आज मैत्री दिन आहे, पण तुझ्यासाठी रोजच special day आहे माझ्यासाठी!

तू फक्त मित्र नाहीस, तू माझं कुटुंब आहेस! मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

लिपस्टिक वापरण्यापूर्वी तपासा! एक्स्पायर झालेली आहे की नाही, असे ओळखा

Navratri 2026 विशेष ट्रेंडी, चविष्ट आणि झटपट होणारे 'मखाना-पनीर अप्पे' नक्की ट्राय करा

मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात हे १२ पदार्थ; आहारातून शक्यतो दूर ठेवा

१०वी नंतर योग्य प्रवाह कसा निवडावा? वापरून पाहा 'या' सोप्या टिप्स!

नवरात्रीच्या गरब्यात मेकअप राहावा रात्रभर फ्रेश; या वॉटरप्रूफ मेकअप टिप्स नक्की फॉलो करा

पुढील लेख
Show comments