suvichar

नवशा गणपती

अमित यादव, नाशिक

PRPR
नाशिकमधील नवशा गणपती हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. हा गणपती नवसाला पावतो, अशी ख्याती आहे. या मंदिराला ३०० वर्षांचा इतिहास आहे. सन १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे नाशिकजवळील आनंदवली हे आजोळ होते. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईंना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्मप्रीत्यर्थ चांदवडसचे नाव बदलून आनंदवली ठेवण्यात आले.

गोदावरीच्या तीरी पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशमूर्ती आहेराघोबादादांनी आनंदवलीस मोठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यास नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. पेशवाई बुडाल्यानंतर आनंदवलीचा वाडाही जाळला. मात्र, परिसरातील मंदिरे शाबूत राहिली. श्री नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकीर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे, अशी माहिती मंदिराचे गुरुजी श्री. शिवाजी बिडकर यांनी दिली.

सन १९८८ मध्ये कै. युवराज जाधव व आनंदवल्ली परिसरातील नागरिकांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. गोदातीरी असलेल्या मंदिरास वारंवार पुराचा तडाखा बसत असल्याने या मंदिराचा जीर्णोध्दार करणे अपरिहार्य होते. सन १९९० च्या कालखंडात संत श्री गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरात अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली. संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थीस या मंदिरात अतिशय गर्दी असते. याप्रसंगी मंदिर प्रशासनातर्फे ५००० किलोच्या महाप्रसादाचे वाटप होते. निसर्गरम्य असलेल्या मंदिर परिसरात अभिषेक, सत्यनारायण पूजा करण्याची सुविधा संस्थेने केली आहे.

श्री नवशा गणपतीमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच 'हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद' यांची दरगाह आहे. दरगाह व मंदिर जरी शेजारी असले तरी त्यांच्यात आजतागायत कधीही वाद झाला नाही. या दोन्ही संस्थांमार्फत 'रामरहिम' मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ती धार्मिक कार्यक्रम करणारी संस्था नसून त्याद्वारे सामाजिक कार्य केले जाते. असे श्री नवशा गणपती मंदिराचे अध्यक्ष श्री. राजेंद्रशेठ जाधव यांनी सांगितले.

सर्व पहा

Vat Purnima 2026 Wishes in Marathi वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

Vat Purnima 2026 वट पौर्णिमा २०२६: पूजा, शुभ मुहूर्त, व्रत कथा आणि जाणून घ्या काय करावे-काय टाळावे

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

Show comments