Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pradakshina प्रदक्षिणा मंत्र आणि प्रदक्षिणा घालण्याचे महत्व आणि योग्य पद्धत

Updated: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (16:06 IST)
* उलट अर्थात डाव्या बाजूला प्रदक्षिणा घालू नये.
 
प्रदक्षिणा प्रकार
देव प्रदक्षिणा : षोडशोपचार पूजेतील पंधरावा उपचार म्हणजे देव प्रदक्षिणा. मंदिरात गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मंत्र किंवा अन्य स्तोत्र किंवा नामस्मरण घेत प्रदक्षिणा घातली जाते.
 
मंदिर प्रदक्षिणा : देवांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणेचा मार्ग गाभाऱ्याभोवती नसून मंदिराभोवती असतो, त्याला मंदिरप्रदक्षिणा म्हणातात.
 
क्षेत्र प्रदक्षिणा : याचे दोन प्रकार असतात- लघु परिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा. लघु परिक्रमेत परिसर, गाव, शहर तीर्थकुंडे, देवस्थाने, क्षेत्रपाल मंदिर आदिंचा समावेश होतो. तर दीर्घ परिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा, तीर्थस्थानांचा समावेश होतो त्याला क्षेत्रप्रदक्षिणा म्हणतात.
 
नदी प्रदक्षिणा : नदी प्रदक्षिणा केवळ पायीच केली जाते. नदी परिक्रमेत नदीत स्नान करणे, नदीचे पाणी पिणे, माधुकरी मागून जेवणे, असे काही नियम पाळाले जातात.
 
वृक्ष प्रदक्षिणा : वृक्ष प्रदक्षिणेत पवित्र वृक्षाची प्रदक्षिणा घालतात तर काही ठिकाणी पर्वत प्रदक्षिणाही केली जाते.
 
कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्या?
एकं देव्यां रवौ सप्त त्रीणि कुर्याद्विनायके । चत्वारि केशवे कुर्यात् शिवे चार्घप्रदक्षिणम् ॥ 
अर्थ - देवीला एक, सूर्याला सात, गणपतीला तीन व विष्णूला चार प्रदक्षिणा कराव्या व शिवाला अर्धी प्रदक्षिणा करावी. शिवाच्या अर्ध्या प्रदक्षिणेची रीत अशी - शिवाच्या अभिषेकाचे जल गाभार्‍यातून ज्या नालीने बाहेर सोडले असेल, तिथवर प्रदक्षिणा करावी आणि ती नाली न ओलांडता परत फिरून देवापुढे यावे. हिला सोमसूत्री प्रदक्षिणा असेही म्हणतात. 
 
हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालाव्या. सूर्य मंदिराला सात प्रदक्षिणा घालव्या.
 
प्रदक्षिणा कशी करावी, त्याविषयी कालिकापुराणात पुढील श्लोक दिला आहे - 
प्रसार्य दक्षिणं हस्तं स्वयं नम्रशिर: पुन: । दक्षिणं दर्शयन् पार्श्व मनसापि च दक्षिण: ॥ 
अर्थ - उजवा हात पुढे पसरून व नतमस्तक होऊन आलले दक्षिण अंग देवाला दाखवीत आणि मनानेही दक्षिन म्हणजे ऋजू वृत्तीचे राहून प्रदक्षिणा करावी. ज्या देवाला प्रदक्षिणा घालता येत नसेल, त्या स्वत:भोवती वर्तुळ भ्रमण करून प्रदक्षिणा घालतात. पण अशा प्रदक्षिणेत देवाला पाठ दाखविली जाते त्यामुळे अशी प्रदक्षिणा शक्यतो टाळावी, असे सांगितले आहे. 
 
प्रदक्षिणचे माहात्म्य वराहपुराणात सांगितले आहे ते असे - 
प्रदक्षिणां यें कुर्वन्ति भक्तियुक्तेन चेतसा । न ते यमपुरं यान्ति यान्ति पुण्यकृतां गतिम् ॥ 
अर्थ - जे भक्तियुक्त अंत:करणाने देवाला प्रदक्षिणा करतात, त्यांचा यमलोक टळतो व ते पुण्यवंतांच्या गतीला जातात.

सर्व पहा

Colorful Coconut Rolls रक्षाबंधनाला बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवा 'रंगीबेरंगी मिठाई'

Jivati Katha Marathi श्रावण शुक्रवारी नक्की वाचा जिवतीची आणि देवीची ही पवित्र कहाणी

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan 2026 Wishes for Sister in Marathi बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan 2026 Date : रक्षाबंधन कधी ? भावाला राखी बांधण्याची योग्य वेळ, शुभ मुहूर्त आणि पूजेची संपूर्ण माहिती

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments