Marathi Biodata Maker
✕

औक्षण का व कसे करावे ? त्यामागे काय शास्त्र आहे? योग्य पद्धत आणि महत्तव जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (13:51 IST)
 
साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी, प्रकाश याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंध:कार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी. अगोदर निरांजनाने त्याला ओवाळायचे.
 
अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणार्‍या शिवाचे (पुरुषतत्त्वाचे) प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. सोन्याने ओवाळण्याचा अर्थ सोन्या सारखे निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य त्याला लाभावे हा होय.
 
सुपारी सारखे टणक आणि अविनाशी आयुष्य लाभावे. म्हणून सुपारीने औक्षण करावे.
सुपारी उजव्या बाजूला ठेवा.
अक्षता या सर्वसमावेशक असल्याने त्यांना मध्यभागी, म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यावे.
अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी असा असल्याने तबकातील अक्षता कपाळी लावून डोक्यावर टाकतात.
तर सर्वात शेवटी कापूस ओवाळून डोक्यावर ठेवायचा आणि म्हणायचे कापसासारखा म्हातारा हो.
अक्षतांच्या थोडेसे पुढे, परंतु मध्यभागी दीपाला स्थान द्यावे. दीप हा जिवाच्या आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणार्‍या सुषुम्नानाडीचे प्रतीक आहे. 
अशा प्रकारे तबकातील घटकांची योग्य मांडणी केल्याने जिवाला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ मिळतो.
 
औक्षण करण्याची योग्य पद्धत
एका पाटाभोवती रांगोळी काढा. ज्याचे औक्षण करायचे आहे त्याला पाटावर बसवा.
सुसंस्कृत व्यक्तीच्या कपाळावर मधल्या बोटाने ओलं कुंकुं लावून त्यावर अक्षत लावाव्या.
निरंजनाचं ताट उचलून त्यातील अंगठी (किंवा सोन्याचे कोणतेही दागिने) आणि सुपारी घ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती फिरवा.
सर्वप्रथम व्यक्तीच्या आदेशाच्या ठिकाणी अंगठी आणि सुपारीला एकत्र स्पर्श करा.
व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून (घड्याळाच्या काट्याच्या दिशेने) अंगठी आणि सुपारी घेऊन डाव्या खांद्यापर्यंत या. तसेच विरुद्ध दिशेकडून आरती करताना उजव्या खांद्यावर यावे. हे तीन वेळा करा. प्रत्येक वेळी ताटासोबत अंगठी आणि सुपारीला स्पर्श करा.
आरतीच्या ताटातून व्यक्तीची आरती काढा.
व्यक्तीला मिठाई खायला द्या.
त्याच्यासाठी प्रार्थना करा.
अक्षता खाली ठेवून त्यावर आरतीचे ताट ठेवा.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दिवाळीत देवदर्शन आणि पर्यटन एकत्र करायचे? नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी सहलीचे नियोजन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

नरक चतुर्दशीला काय करावे आणि काय करू नये? महत्त्वाचे नियम जाणून घ्या

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments