Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ११

Updated: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (12:50 IST)
 
३४ रेवण नाथ
 
॥ रेवा तीरी बाळ । वालूमाजी मिळे । सहनु सारूकें । पाळीयेलें ॥१८॥
॥ कृषीका ती विद्या । पितयानें एकू । दिली, परी त्यासी । अनुग्रहो- ॥१९॥
॥ दत्तात्रेय गुरु । यांचा तो प्रसाद । सिद्धि वश त्यासी । तोचि छंद ॥२०॥
॥ प्राण्यां-जनां-ग्रामां । मिष्टान्नांनीं भोजी । दत्तात्रेयां कोठें । भिक्षान्नें जी ॥२१॥
॥ तदा दत्तनाथ तपूं त्यासी दीले । ब्रह्मज्ञानी होई । रेवणू तो ॥२२॥
॥ विटें ग्रामामाजी "। रेवणू राहीली सप्त बालकांतें । सोडवीले ॥२३॥
॥ यमपूरीज तैसी । कैलासीहि जाई । आणूनीया आई । तोषवीली ॥२४॥
 
वट सिध्द - नागनाथ
 
॥ कोणी कोशधर्मा । वृक्षीं वटा तली । बाळातें पाहोनी । गेहीं नेतु ॥२५॥
॥ बाळ तो खेळतो । अन्न संतपर्णी । मिष्टान्नें लटकी । दानी शूर ॥२६॥
॥ कोणी नारायणू । जन्मा आला योगी । आविर्होतृ नरू । रुपें येई ॥२७॥
॥ ‘दत्तात्रेया नाथा । भेटवावें ताता’ । विनवितो बाळ । वट-सिध्द ॥२८॥
॥ पांचाळी शोधीतू । येई मातापूरी । तैसा कोल्हापूरी । काशीतहि ॥२९॥
॥ पक्वान्नें मिष्टान्नें । सर्वा वाढीताहे । दत्त गुरु येती । भेटायातें ॥३०॥
॥ नाथु तेथें येतां । भिक्षेचिया मिषे- । पाय धरी, तोषें । अन्तरी तो ॥३१॥
॥ उभय ते क्षेत्री । काशीपुरी येती । शिवासीहि भेटी । तेथें दोघां ॥३२॥
॥ तेथोनि यात्रेसी । भूमीवरी जाई । वडिवाळी राही । सर्वा क्षेमू ॥३३॥
॥ मच्छिंदु पारखी । येई तो या ग्रामी । विद्या शस्त्रें अस्त्रें । ओपी तया ॥३४॥

सर्व पहा

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments