Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३८

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (15:03 IST)
 
नारदानें आधींच कळ लावून दिली होती. तशांच दक्षिणाहि मनाप्रमाणें मिळाली नाहीं, म्हणुन चरपटीस राग आला. तो यजमानास म्हणाला, तुम्हीं मला ओळखिलें नाहीं. हें कार्य कोणतें, ब्राह्मण किती योग्यतेचा, त्याच्यायोग्य दक्षिणा किती द्यावयाची याचें तुम्हांस बिलकुल ज्ञान नाहीं. तें चरपटीचें भाषण ऐकून यजमान म्हणाला, मुला ऐकून घे. तुजा पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी, पण यजमानास सामर्थ नसेल तर तो काय करील ? तेव्हां चरपटी म्हणाला, अनुकुलता असेल त्यानेंच असलीं कार्यें करण्यास हात घालावा ! अशा तर्‍हेनें दक्षिणेबद्दल उभयतांची बरीच बोलाचाली सुरु झाली.
 
 
तें पाहून, चरपटीनें दक्षिणेसाठीं यजमानाशीं मोठा तंटा करून त्यानें मन दुखविल्याचें वर्तमान नारदानें घरीं जाऊन सत्यश्रव्यास सांगितलें आणि त्यास म्हटलें, चरपटीनें निष्कारण तंटा केला. यामुळें आतां हा यजमान मात्र तुमच्या हातांतुन जाईल. यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार. आज चरपटीनें भांडून तुमचें बरेंच नुकसान केलें. आपण पडलों याचक; आर्जव करून व यजमानास खूष करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत.
 
नारदानें याप्रमाणें सांगितल्यावर सत्यश्रवा रागावला व पूजा आटोपून लागलाच यजमानाकडे गेला. तेथें दोघांची बोलाचाली चालली होती, ती त्यानें समक्ष ऐकीली. ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्यानें खाडकन त्याच्या तोंडांत मारली.
 
चरपटी अगोदर रागांत होताच, तशांच बापानें शिक्षा केली. या कारणानें त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून पश्चात्तापानें निघून गांवाबाहेर भगवतीच्या देवालयांत जाऊन बसला. नारद अंतसीक्षच, त्याच्या लक्षांत हा प्रकार येऊन त्यानें दुसर्‍या ब्राह्मणाचें रूप घेतलें व तो भगवतीच्या देवालयांत दर्शनास गेला दर्शन घेतल्यावर त्यानें चरपटीजवळ बसून तुम्हीं कोण, कोठें राहतां म्हणुन विचारलें. तेव्हां चरपटीनें सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्राह्मणरूपी नारदानें बोलून दाखविलें कीं त्या सत्यश्रव्या ब्राह्मणाला वेड लागलेलें दिसतें. अविचारानें मुलगा मात्र हातांतला घालविला. त्या मुर्ख म्हातार्‍याची बुद्धि चळली खचित आतां तूं त्याला पुनः तोंड दाखवूच नको, खुशाल त्याचा त्याग करुन अरण्यांत जा. ह्याप्रमाणें नारदानं सांगतांच, चरपटीस पूर्ण पश्चात्ताप होऊन त्यानें पुनः घरीं न जाण्याचें ठरविलें आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला, तुम्हीं माझ्या घरीं जाऊन गुप्तपणानें त्या कुलंबास घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे कोठें तरी अन्य देशांत जाऊन विद्याभ्यास करून राहूं.
 
मग तो ब्राह्मणरुपी नारद कुलंबास आणावयासाठीं उठून बाहेर गेला. थोड्या वेळानें कुलंबाचा वेष घेऊन आला. नंतर सत्यश्रव्यापाशीं न राहतां अन्यत्र कोठं तरी जाऊन अभ्यास करुन राहूं असा कुलंबाचाहि अभिप्राय पडला. मग ते दोघे एके ठिकाणी एकमतानें राहण्याचें ठरवून तेथून निघाले. ते बरेच लांब गेल्यावर कुलंबानें म्हटलें कीं, आतां आपण प्रथम बदरिकाश्रमास जाऊं व बदरी केदाराचें दर्शन घेऊन मग काशीस जाऊन तेथें विद्याभ्यास करुं हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला.
 
मग ते दोघे बदरिकाश्रमास गेले. तेथें देवालयांत जाऊन त्यांनीं बदरीकेदारास नमस्कार केला. इतक्यांत दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथा प्रकट झाले. कुलंबानें ( नारदानें ) दत्तात्रेयाच्या पायां पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला. चरपटीहि दोघांच्या पायां पडला व हें उभयतां कोण आहेत म्हणुन त्यानें कुलंबास विचारलें. मग कुलंबानें त्याची नावें सांगितली व स्वतःकडे हात करुन म्हटलें कीं, या देहाला नारद म्हणतात; तुझें कर्य करण्यासाठीं मीं कुलंबाचा वेष घेतला होता. हें ऐकून चरपटी नारदाच्या पायां पडून दर्शन देण्यासाठीं विनंति करुं लागला. तेव्हां नारदानें त्यास सांगितलें कीं, आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊं. परंतु गुरुप्रसादावांचुन आम्ही तुला दिसणार नाहीं. एकदां गुरुनें कानांत मंत्र सांगितला कीं, सर्व जग ब्रह्मरूप दिसेल. तें ऐकून चरपटी म्हणाला,
 
तुमच्याहुन श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढूं ? तरी आतां तुम्हीं मला येथें अनुग्रह देऊन सनाथ करावें. तेव्हां नारदानें दत्तात्रेयास सुचना केली. मग दत्तानें चरपटीच्या मस्तकावर हात ठेविला व कानांत मंत्र सांगितला. तेव्हां त्याचें अज्ञान लागलेंच जाऊन त्यास दिव्यज्ञान प्राप्त झालें. मग चरपटीनाथास त्यांचें दर्शन झालें. त्यानें तिघांच्या पायांवर मस्तक ठेविलें. ह्याच संधीस शंकरानेंहि प्रकट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले. त्याच्या तोंडावरून हात फिरविला आणि विद्याभ्यास करवून नाथपंथ देण्याबद्दल दत्तात्रेयास सांगितलें. मग दत्तात्रेयानें त्यास सर्व विद्या पढविल्या; संपूर्ण अस्त्रविद्येंत वाकबगार केलें व तपश्चर्येंस बसविलें. पुढें नाग‍अश्वर्त्थी जाऊन बारा वर्षें राहून वीरसाधन केलें व नवकोटी सातलक्ष साबरी कवित्व केलें. मग त्यास सर्व देवांनीं येऊन आशीर्वाद दिले. नंतर श्रीदत्तात्रेय गिरिनारपर्वतीं गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला. त्यानें रामेश्वर, गोकर्णमहाबळेश्वर, जगन्नाथ, हरिहरेश्वर, काशीं आदिकरून बहुतेक तीर्थें केली, त्यानें पुष्कळ शिष्य केले, त्यातुंन सिद्धकला जाणणारें नऊ शिष्य उदयास आले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख