suvichar
✕

मोक्षाचे कारण त्यागत्या

Updated: शुक्रवार, 30 जुलै 2010 (11:55 IST)
त्यागाचे अनन्यसाधारण महत्त्व आपण जाणतो. आपल्या अस्तित्वाच्या जाणिवेचा त्याग केल्याशिवाय आपल्याला शांत झोप लागत नाही आणि निद्रेतील विश्रांतीचा त्याग केल्याशिवाय आपण काम करण्यास सज्ज होऊ शकत नाही. मोठमोठे शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, संगीतकार, कलाकार अथक प्रयत्नाने मानवी जीवन समृद्ध करतात. त्यासाठी त्यांनी सामान्य जीवनप्रणालीचा त्याग केलेला असतो. भगवद्गीतेतील भगवंताने ठिकठिकाणी त्यागाचे महत्त्व वर्णन केले आहे. त्यागातच सर्वोच्च समाधान आहे हे पटवून दिले आहे.

मग प्रश्न निर्माण होतो, की आपण नक्की कशाचा त्याग करायला हवा? घरादाराचा, कामधंद्याचा, पैशाचा, नात्यांचा कशाचा त्याग अपेक्षित आहे? सांख्यांच्या मते, 'त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहूर्मनीकणिषः।' म्हणजे प्रत्येक कर्मच दोषवत आहे. कारण कर्म नेहमीच कर्मफल निर्माण करते आणि मग ते भोगण्यासाठी आपल्याला एका जन्मातून दुसर्‍या जन्मात जावे लागते. म्हणूनच त्यांचा त्याग करावा. परंतु कर्माचा त्याग आपण करूच शकत नाही. कारण भगवान स्वतः अठराव्या अध्यायात सांगतात,
' न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माष्यशेषतः ।'
म्हणजे जो शरीरधारी आहे तो कर्म सोडूच शकत नाही. कारण पातंजल योगसूत्रानुसार श्वासोश्वास करणे हे देखील कर्म आहे. म ग देहधारण करणारा कोणीच कर्माशिवाय राहूच शकत नाही. मग आपल्याला कर्मबंधनात तर अडकायचे नाही; परंतु कर्म सोडता येत नाही. मग त्याग करायचा तो कशाचा? त्यावर स्वतः भगवान उत्तर देतात, ''यस्तु कर्म फल त्यागी स त्यागीत्यभियते।''
म्हणजेच कर्मफलाचा जो त्याग करतो तो करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? कारण मला फल नको असे म्हटले तरी कर्म झाल्यावर फल तयारच होणार. मग ते त्यागायचे कसे? तर भगवान सांगतात, की कर्म फल त्यागायचे म्हणजे प्रत्येक कर्मामागे आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलायचा. म्हणजे आपण रोज जी कर्मे करतो तीच, परंतु वेगळ्या दृष्टिकोनातून करायची. तो वेगळा दृष्टिकोन कोणता? तर ''यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिती चापरे॥ किंवा ''यज्ञो दानं तपश्चैव पावननि मनीषिणाम्‌ ॥

म्हणजेच प्रत्येक कर्म, यज्ञ, दान, तप या दृष्टिकोनाने करावे. येथे या शब्दांचे सांकेतिक मूल्य आहे. ज्याप्रमाणे संगणक तज्ज्ञाच्या दृष्टिकोनाने माऊस या शब्दाचा अर्थ मूळ अर्थापेक्षा भिन्न असतो तसेच काहीसे येथे आहे. यज्ञ म्हणजे आपली अशी जीवनपद्धती की ज्यामुळे आपल्याला समाजाकडून आजवर जे मिळाले तो पैसा, ज्ञान, मानमरातब, आदर ते व्दिगुणित करून आपण समाजाला अर्पण केले पाहिजे. त्यावर आपला वैयक्तिक मालकी हक्क नाही. त्यामुळे त्याचा वापर आपण बहुजन हितासाठी केला पाहिजे. ते आपले कर्तव्यच आहे, असे समजले नाही तर प्रत्येक कृती करताना त्याचे रुपांतर अहंकारात होते व कर्मबंधन तयार होते. म्हणून कर्ता आहोत या भूमिकेची आहुती म्हणजे यज्ञ. त्याचप्रमाणे आपण काहीतरी देऊ शकतो अशी भूमिका मनात असते, तोपर्यंत देणारा व घेणारा अस्तित्वात असतो म्हणून त्याला व्यवहार म्हणतात. ज्यात देणार्‍याला हे आपले कर्तव्य आहे याची जाण असते ते दान आहे. म्हणूनच माता आपल्याला जन्म देते. त्याचे लालनपालन करते याला आजही मानाचे स्थान आहे, कारण मागच्या पिढीने तेच केले पुढेही ही परंपरा चालूच राहणार आहे, हे आपले कर्तव्यच आहे, हे प्रत्येक माता जाणते.

म्हणूनच आपल्याजवळ जे आहे ते संग्रहित न करता कर्तव्य भावनेने ते गरजवंतांना उपलब्ध करून देणे हेच आपले उद्दिष्ट आहे आणि त्याची मार्ग ा ᆬमणाच तप आहे. त्यामुळे 'पावनानि मनीषिणाम्‌ ॥' म्हणजे मन पूर्ण पवित्र होईल आणि पवित्र मन हेच परमेश्वराचे प्रकटीकरण, मग येथे कोणतेच बंधन नाही आणि हाच खरा मोक्ष आहे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Worshiping Surya on Sunday रविवारी व्रत आणि सूर्याची पूजा केल्याचे 5 फायदे

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

Show comments