शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (17:48 IST)

‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार

‘ट्रिपल एक्स’ चित्रपट मालिकेतील तिसरा आणि बहुप्रतिक्षित असा हा ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दीपिकाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.  जगातील कोणत्याही देशातील प्रदर्शनापूर्वी १४ जानेवारीला हा चित्रपट भारतीय चित्रपटगृहात दाखल होईल असे दीपिकाने म्हटले आहे. भारतामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर २० जानेवारीला हा चित्रपट इतर देशात प्रदर्शित होईल. या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारणाऱ्या दीपिका या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.