शनिवार, 22 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (11:25 IST)

लादेनच्या आईचा मृत्यू

laden mother death
विमान उतरत असताना झालेल्या अपघातात अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेनच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला.

यामध्ये लादेनच्या सावत्र आईचाही समावेश आहे. बिन लादेन कुटुंबाचे खासगी विमान दक्षिण ब्रिटनमध्ये हॅम्पशायरच्या ब्लॅकबुशे विमानतळावर उतरत असताना हा अपघात होऊन यामध्ये चार जण ठार झाले.

द डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, मृतांत ओसामाची सावत्र आई रजा हशीम आणि बहीण सना व सनाचा पती जुहैर हशीम याचा समावेश आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी आपण ब्रिटिश अधिकार्‍यांबरोबर काम करणार आहोत, असे सौदीने म्हटले आहे.