Festival Posters

अमेरिकेतीत पाळणाघरातील मुलाने 2 मुलांना गोळी घालून जखमी केले

Updated: शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (09:38 IST)
समांथा युबॅंक्‍स हिच्या डीयरबॉर्न मिशिगनमधील पाळणाघरात सहा लहान लहान मुले सांभाळण्यासाठी येतात. सकाळी समांथाला वरच्या मजल्यावरून मोठा आवाज आणि गडबड ऐकू आली. ती धावतच वर गेली आणि पाहिले, तर तिच्या तीन वर्षांच्या मुलाच्या हातात तिच्या पतीची हॅंडगन होती, आणि त्याने दोन मुलांवर गोळ्या झाडल्या होत्या. ही दोन्ही मुले तीन वर्षांचीच होती. एकाच्या डोक्‍यात गोळी घुसली होती, तर दुसऱ्याचा खांद्‌यात गोळी घुसली होती. गंभीर अवस्थेत दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
 
दोन्ही मुलांची प्रकृती आता धोक्‍याच्या पलीकडे असून त्यांच्यात सुधारणा होत आहे. मात्र डोक्‍यात गोळी घुसलेल्या मुलाचा एक डोळा निकामी झाला असून त्याच्यावर अनेक शस्त्रक्‍रिया करण्यात आल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे.
 
गुरुवारी समांथा आणि टिमोथी या युबॅंक्‍स पतिपत्नीवर पोलीसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. युबॅंक्‍स आपल्या घरात विनापरवाना पाळणाघर चालवत होते. दुसऱ्या मजल्यावरील आपल्या पतीच्या बेडरूममध्ये त्याची शस्त्र असुरक्षिपने ठेवलेली असतात हे समांथाला माहीत होते. आरोप सिद्‌ध झाल्यास समांथा आणि टिमोथी दहा वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा होई शकेल. या जोडप्याला सहा मुले असून गोळ्या झाडणारा तीन वर्षांच्या मुलगा त्याच्या जुळ्या मुलांपैकी एक आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुसळधार पाऊस आणि वाढत्या पाणीपातळीमुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या

शेवंतीची यशस्वी शेती: लागवड ते भरघोस उत्पादन

वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला

आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाले

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधू २६ जुलै रोजी मुंबईत आंदोलन करणार

पुढील लेख
Show comments