Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानात झालेल्या भीषण भूकंपात 255 लोकांचा मृत्यू, शेकडो जखमी, पाकिस्तानातही विध्वंस

Last Updated: बुधवार, 22 जून 2022 (11:48 IST)
काबूल/इस्लामाबाद- : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या भीषण भूकंपाने मोठी हानी केली आहे. हा भूकंप रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेचा होता.

अफगाणिस्तानमध्ये किमान 255 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर शेकडो लोक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानातील अनेक परिसरात विध्वंस झाला आहे. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिणपूर्व अफगाणिस्तानमधील खोस्ट शहरापासून 44 किमी अंतरावर होता.

अफगाणिस्तानची वृत्तसंस्था बख्तरने या मोठ्या विध्वंसाचे वृत्त दिले आहे. एजन्सीने सांगितले की, बचावकर्ते हेलिकॉप्टरने या भागात पोहोचले आहेत. तालिबान सरकारचे उपप्रवक्ते बिलाल करीमी म्हणाले, 'पक्तिका प्रांतातील 4 जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून डझनभर घरे उद्ध्वस्त झाली आहेत. सर्व मदत एजन्सींना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी पुढील विध्वंस टाळण्यासाठी त्यांची टीम या भागात पाठवावी.
अफगाण मीडियानुसार, खोस्तमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाल्याचे चित्र समोर येत आहे. पाकिस्तानमध्येही खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. भूकंपामुळे घराचे छत कोसळले, त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा भूकंप पाकिस्तानी वेळेनुसार पहाटे 1.54 वाजता झाला.

पेशावर, इस्लामाबाद, लाहोर आणि पंजाब आणि पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या इतर भागात आणि भारतापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपामुळे अनेक भाग उद्ध्वस्त झाल्याचे अफगाण भागातून आलेल्या प्रतिमा दाखवतात. युरोपीयन भूकंप केंद्राने अंदाज वर्तवला आहे की त्याचे हादरे सुमारे 500 असतीलकिलोमीटर परिसरात जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांनंतर लोक घाबरले आणि रस्त्यावर आले. तत्पूर्वी, गेल्या शुक्रवारी पाकिस्तानच्या अनेकशहरांमध्ये 5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Corona Update : मुंबईत आज 867 नवे कोरोना रुग्ण आढळले

Corona Update :   मुंबईत आज 867 नवे कोरोना रुग्ण आढळले
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे नागरिकांना कोरोनापासून ...

Nashik : नाशिकात स्वाईन फ्लूचे 24 तर डेंग्यूचे 19 रुग्ण ...

Nashik : नाशिकात स्वाईन फ्लूचे 24 तर डेंग्यूचे 19 रुग्ण आढळले
सध्या कोरोनाचा प्रदृभव कमी होत असताना नाशिक जिल्ह्यात स्वाईनफ्लूचे 24 तर डेंग्यूचे 19 ...

जेवणात पाल पडल्याने एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा ...

जेवणात पाल पडल्याने एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा होऊन दोघांचा मृत्यू
विरार पूर्व मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडवी परिसरातील कण्हेर येथे नालेश्वर नगर येथे ...

भारताने विक्रम केला, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची ...

भारताने  विक्रम केला, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची दोन्ही टोके जोडली
काश्मीरला थेट राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा आणि जगातील सर्वात ...

Monkeypox in Delhi: दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण

Monkeypox in Delhi: दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण
दिल्लीत मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ...