Dharma Sangrah
✕

कोरोनानंतर आणखी एक नवीन बर्ड फ्लू स्ट्रेन

Updated: बुधवार, 27 एप्रिल 2022 (12:27 IST)
 
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी सांगितले की, मध्य हेनान प्रांतात राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलामध्ये याची पुष्टी झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ताप आणि इतर लक्षणांसह त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर, चाचणी दरम्यान, त्याला या दुर्मिळ आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. NHC ने एका निवेदनात म्हटले आहे की मुलाचे कुटुंब घरी कोंबडी पाळतात. आणि तो जंगली बदकांनी भरलेल्या भागात राहत होता.
 
या मुलाला थेट पक्ष्यांकडून संसर्ग झाल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यांनी असेही सांगितले की हा स्ट्रेन  मानवांना प्रभावीपणे संक्रमित करणारा आढळला नाही. मुलाच्या कुटुंबीयांची आणि मित्रांचीही तपासणी करण्यात आली. अहवाल असामान्य न्हवंत.
 
NHC ने सांगितले की मुलाचे केस वन-वे क्रॉस-प्रजाती ट्रान्समिशन होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका कमी होतो. तथापि, लोकांना मृत किंवा आजारी पक्ष्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, ताप किंवा श्वासोच्छवासाच्या लक्षणांवर तत्काळ उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 
 
एव्हीयन इन्फ्लूएन्झा प्रामुख्याने जंगली पक्षी आणि कुक्कुटांमध्ये आढळतो. मानवांमध्ये संक्रमणाची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहेत. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, 1997 आणि 2013 मध्ये आढळून आलेले बर्ड फ्लूचे H5N1 आणि H7N9 स्ट्रेन, एव्हीयन इन्फ्लूएंझा पासून मानवी आजाराच्या बहुतेक प्रकरणांसाठी जबाबदार आहेत.
 
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, झुनोटिक किंवा प्राणी-जनित, इन्फ्लूएंझाचे मानवी संक्रमण प्रामुख्याने संक्रमित प्राणी किंवा दूषित वातावरणाच्या थेट संपर्काद्वारे होतात, परंतु लोकांमध्ये या विषाणूंचा प्रसार होत नाही. 2012 मध्ये H3N8 ला युनायटेड स्टेट्सच्या ईशान्य किनारपट्टीवर 160 हून अधिक मृत्यूंसाठी जबाबदार धरण्यात आले होते, कारण यामुळे प्राण्यांमध्ये घातक न्यूमोनिया झाला होता.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पीएफ नियमांमध्ये मोठा बदल, आता वयाच्या ५५ ​​वर्षांपूर्वी २ महिन्यांच्या आत खात्यातून ९०% निधी काढता येईल

LIVE: पुणे जिल्हा परिषदेने वर्ष २०२६-२७ साठी पशुसंवर्धन योजना सुरू केल्या

अखिलेश यादव यांच्या पीडीए दौऱ्यादरम्यान रोड शोमध्ये JCBने 14 वर्षीय मुलाला चिरडले

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रो स्टेशनची नावे बदलणार! फडणवीस यांनी विशेष समिती स्थापन केली

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

पुढील लेख