Dharma Sangrah
✕

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मानवाधिकारांचं उल्लंघन- इम्रान खान

Updated: बुधवार, 11 डिसेंबर 2019 (10:17 IST)
 
इम्रान खान यांनी ट्वीट करून म्हटलं, "भारतीय लोकसभेत जे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संमत झालं आहे ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचं आणि पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय संबंधांचं उल्लंघन आहे. आम्ही या गोष्टीची निंदा करतो. आरएसएसच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न फॅसिस्ट मोदी सरकारनं यानिमित्तानं केला आहे."
 
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर पाकिस्तानी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन (10 डिसेंबर) हा ट्विटरवर टॉप ट्रेंड होता. त्याचसोबत मुस्लिम आणि मोदी हे पाकिस्तानमध्ये ट्विटरवर ट्रेंड होत होते.
 
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला फारसे कष्ट पडले नाहीत. कारण लोकसभेत भाजपला बहुमत आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला भाजपच्या 303 खासदारांसह एकूण 311 खासदारांनी समर्थन दिलं.
 
आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येईल. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं तर विधेयकाचं रुपांतर कायद्यात होईल. भाजपनं 10 डिसेंबर आणि 11 डिसेंबरला आपल्या पक्षाच्या खासदारांसाठी व्हीप काढला आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौरने एक मोठे विधान केले

फ्लोरिडा विद्यापीठाजवळ झालेल्या गोळीबारात अनेक अल्पवयीन मुलांसह ११ जण जखमी

नाशिकमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद! सिंहस्थ कुंभाच्या आधी गोदावरी तीरावर ५१७ जणांचा एकत्र शंखनाद

केनियामध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत भीषण अपघात: २२ जणांचा मृत्यू

Meera Bai Jayanti: मीराबाई जयंती, जाणून घ्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची कहाणी

पुढील लेख
Show comments