केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (Citizenship Amendment Bill किंवा CAB) 2019 चर्चेसाठी मांडलं. सत्ताधारी भाजपसाठी अतिमहत्त्वाचं असं हे विधेयक सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला आधीच मान्यता दिली असून, भाजप पक्षश्रेष्ठींनी या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी आधीच व्हिप जारी केला आहे. तसंच सर्व खासदारांना...