Marathi Biodata Maker

मंगळ ग्रहावर आढळला दरवाजा, इथं खरंच परग्रहवासी राहतात का?

Updated: शुक्रवार, 20 मे 2022 (21:10 IST)
 
दरवाजाची आकृती कशी बनली असावी?
नासाच्या क्युरोसिटी रोव्हरद्वारे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचा हा फोटो 7 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.
 
सोल 3466 सिरीजमधील हा फोटो असल्याचं नासाने म्हटलं होतं. याला मार्स एक्सप्लोरेशन प्रोग्रॅमच्या वेबसाईटवर अनेक फ्रेमसह प्रसिद्ध करण्यात आलं होतं.
 
पण दरवाजाचा हा आकार पाहताच इंटरनेटवर एकच खळबळ माजली. लोक या फोटोसंदर्भात अनेक कथा सांगू लागले.
 
पण हा फोटो या या सिरीजमधला एक छोटासा भाग आहे. संपूर्ण आकार पाहिल्यास फोटो पाहणाऱ्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.
 
नासाने बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं, "ही जागा म्हणजे जमिनीतील एक छोटासा खळगा किंवा फट आहे."
 
ही आकृती पूर्णपणे पाहण्यासाठी खालील फोटो नीट पाहा. या फोटोमध्ये दिसतं की दरवाजा म्हणून सांगितली जाणारी जागा ही अतिशय छोटी आहे.
 
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी म्हणजेच JPL च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही फट आकाराने अतिशय छोटी म्हणजे 45 सेंटीमीटर लांब आणि 30 सेंटीमीटर रुंद आहे."
 
नासाच्या मते, या पूर्ण फोटोमध्ये अनेक फ्रॅक्चर (फट) आहेत. लांबून घेतलेल्या फोटोत हे पाहता येऊ शकतं.
 
उत्सुकता वाढवणारे फ्रॅक्चर
गेल्या काही दिवसांत अनेक या फ्रॅक्चरवर तज्ज्ञांचं लक्ष गेलं.
 
ब्रिटनच्या भू-शास्त्रज्ञ नील हॉजसन यांनी मंगळावरील भू-आकृतींचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या मते, "या फोटोंमुळे उत्सुकता वाढली आहे. पण त्या गूढ अशा बिलकुल नाहीत."
 
लाईव्ह सायन्स नामक वेबसाईटशी बोलताना त्यांनी म्हटलं, "थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ती एक निसर्गतः तयार झालेली खाच आहे. फोटोत अशा प्रकारच्या अनेक खाचा दिसू शकतील. त्यामध्ये माती किंवा वाळूचे अनेक थर आहेत."
 
हॉजसन यांनी सांगितलं, "जमीन बनत असताना सुमारे 400 कोटी वर्षांपूर्वी हे थर जमा होत गेले. नदी किंवा हवेच्या माध्यमातून टेकडी बनत गेली आणि जमीन तयार झाली. अशा प्रकारच्या पृष्ठभागावर हे खाचखळगे तयार होणं स्वाभाविक आहे."

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारा हा भारताचा पुरुष आणि महिला स्क्वॅश संघ असेल

LIVE: भाजप आमदाराचा दावा, रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात

चीनच्या बंदरात एका मालवाहू जहाजाला भीषण आगीत २० जणांचा मृत्यू

मुंबईत १० दिवसांच्या उपचारानंतर अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

India vs Afghanistan श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दिल्लीत दाखल

पुढील लेख
Show comments