शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (14:28 IST)

Omicron Infection: ओमिक्रॉन व्हेरियंटचा रोगप्रतिकारक शक्तीवर होणाऱ्या परिणामाबाबत शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा

covid
ग्लॅडस्टोन इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्कोच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटबद्दल खुलासा केला आहे. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, ज्या लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही अशा लोकांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉनव्हेरियंटचा संसर्ग कोरोनाच्या इतर व्हेरियंट विरूद्ध फारच कमी दीर्घकालीन प्रतिकारशक्ती प्रदान करतो. 
 
ग्लॅडस्टोन इन्स्टिट्यूट आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ सॅन फ्रान्सिस्कोच्या संशोधकांनी उंदीर आणि संक्रमित लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास केला. यामध्ये त्यांना आढळले की ओमिक्रॉन केवळ कमकुवत रोगप्रतिकारक प्रतिसादास प्रेरित करते.
 
या अभ्यासात सहभागी असलेल्या इरेन चेन यांनी सांगितले की, जेव्हा ओमिक्रॉनचे व्हेरियंट  पहिल्यांदा दिसले तेव्हा ओमिक्रॉन संसर्ग लसीकरण न केलेल्या लोकांसाठी लस म्हणून काम करू शकेल का याविषयीही प्रश्न उपस्थित होते. म्हणूनच संशोधकांच्या टीमने प्रथम ओमिक्रॉनचा उंदरांवर होणारा परिणाम तपासला. संशोधनात, ओमिक्रॉनमुळे उंदरांमध्ये कोरोना आणि त्याच्या डेल्टा प्रकारापेक्षा खूपच कमी लक्षणे दिसून आली. 
 
अभ्यासात असे दिसून आले आहे की कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरण केलेल्या लोकांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग व्हायरसच्या विविध व्हेरियंट विरूद्ध कमकुवत प्रतिसाद मजबूत करतो. तथापि, लसीकरण न केलेल्या लोकांमध्ये हा रोगप्रतिकारक प्रतिसाद इतर व्हेरियंटपासून संरक्षण प्रदान करण्यात अयशस्वी ठरला, असे ग्लॅडस्टोन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संचालक मेलानी ओट यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की ओमिक्रॉनचा संसर्ग COVID-19 च्या इतर व्हेरियंट विरूद्ध सौम्य संरक्षण प्रदान करतो.
 
ग्लॅडस्टोन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या वरिष्ठ अन्वेषक आणि यूसी बर्कले येथील प्राध्यापक जेनिफर डौडना यांनी सांगितले की, संशोधनात असे आढळून आले आहे की एखाद्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला असला तरीही त्यांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच लसीकरण खूप महत्वाचे आहे.