गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: पॅरिस (फ्रान्स) , सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (09:58 IST)

आयफेल टॉवरवर 30 कोटी पर्यटकपूर्ती निमित्त नेत्रदीपक ‘लाइट शो’

आयफेल टॉवर म्हणजे फ्रान्सचे विशेष मानचिन्ह. 1889 साली उभारण्यात आलेला आयफेल टॉवर हे जगभरातील पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे. आयफेल टॉवर नेत्रदीपक “लाइट शो’ झगमगून निघाला होता. निमित्त होते, 30 कोटी पर्यटकपूर्तीचे-आयफेल टॉवरच्या निर्मितीपासून आजपर्यंत त्याला भेट दिलेल्या देशविदेशच्या पर्यटकांच्या संख्येने 30 कोटीचा आकडा पार केला आहे. त्यानिमित्त एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
या कार्यक्रमासाठी आलेल्या पहिल्या 15,000 पर्यटकांना प्रवेश फीची सूट देण्यात आली होती. त्यांना पहिल्या मजल्यावर असलेल्या डीजे सेटवर डान्स करण्याचीही मुभा होती, मात्र त्यासाठी लिफ्टच वापर न करता 328 पायऱ्या चढून जाणे त्यांच्यासाठी अनिवार्य करण्यात आले होते. दुसऱ्या मजल्यावर जाझ संगीत होते आणि तिसऱ्या मजल्यावर “फ्ल्यूट ट्रायो’ ने रोमॅंटिक माहोल निर्माण केलेला होता.
 
आयफेल टॉवर हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. गेल्या वर्षी आयफेल टॉवरला 58 लाख पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. 30 कोटी पर्यटकपूर्तीनिमित्ताने आयफेल टॉवरवर संध्याक़ाळी 7.30 पासून ते मध्यरात्रीपर्यंत दर अर्ध्या तासाला खास लाइट शोचे आयोजन करण्यात आले होते.